Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
क्राईमशिर्डी

पुन्हा शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर उडविण्याची धमकी

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

देशातील दोन नंबरचे देवस्थान आणि राज्यातील नंबर एक  गर्दीचे ठिकाण म्हणून शिर्डीकडे पाहिलं जातं त्यामुळे शिर्डीच्या साई मंदिराला  वारंवार टार्गेट करून धमक्या येत असतात आहे  मे महिन्यात देखील अशाच प्रकारे धमकीचे मेल आले होते

DN SPORTS

kamlakar

   त्यानंतर श्री साईबाबा संस्थान सह सर्व यंत्रणा अलर्ट बघायला मिळत होत्या काल दि. २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ८:०४ वाजता, श्री साईबाबा संस्थानच्या अधिकृत ई-मेल आयडीवर (obt@sai.org.in) “4 Nitric Improvised EDs Planted in Shirdi Sai Mandir/Rooms to Activate at 1PM, Clear All Devotees/Staff!” अशा विषयाची एक धोकादायक धमकीची ई-मेल आलाय होता

  हे ई-मेल एक भगवंत मन्न नावाच्या व्यक्तीच्या bhagwanthmann@yandex.com या मेल आयडीवरून आलेली आहे. या मेलमध्ये असं म्हटलं आहे की, शिर्डी साई मंदिरात व त्यातील खोल्यांमध्ये ४ नायट्रिक Improvised Explosive Devices (IEDs) ठेवण्यात आल्या होत्या त्या दुपारी १ वाजता सक्रिय झाल्या होत्या,

त्यामुळे सर्व भाविक व कर्मचारी यांना तत्काळ मंदिर परिसरातून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानंतर संस्थानाने शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती खबरदारीचे सर्व उपाय योजना करण्यात आलेल्या होत्या कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे

साईभक्तास व ग्रामस्थांना काहीही अनुचित प्रकार घडत आहे असे दिसल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला कळवावे असेही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button