Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरशिर्डी

संस्थानच्या साई आश्रम टू मध्ये सापडलेली दोन लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन असणारी पर्स संस्थान कर्मचाऱ्यांने त्या भक्ताला केली परत!

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथे साई आश्रम भक्तनिवास येथे ड्युटीला असणारे केशव बारकू गोरे यांना दोन लाख रुपये किमंतीची सोन्याची चैन व तीन हजार शंभर रुपये रोख असणारी पर्स सापडली. ती त्यांनी त्या पर्समधील असणाऱ्या साई भक्तांच्या फोटोवरून त्यांचा शोध घेऊन त्यांना परत केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे मोठे कौतुक होत आहे. हे केशव पार्क गोरे हे साई संस्थांनचे बाह्य स्रोत कर्मचारी आहेत. यासंदर्भात अधिक माहिती कि,दिनांक 19/06/2025 रोजी साईं आश्रम भक्तनिवास येथे ड्युटी ला असणारे बाह्यस्त्रोत कर्मचारी श्री. केशव बारकू गोरे यांना एच इमारतीच्या गेट जवळ एक पर्स सापडली.

पर्स मध्ये 1 सोन्याची चैन व 2 सोन्याच्या बांगड्या ( किंमत 2,00,000/- रु अंदाजे ) तसेच 3100/- रु रोख रक्कम होती.पर्स मध्ये पासपोर्ट फोटो होतो. त्या अनुषंगाने तेथील इतर कर्मचारी आणि सुपरवायझर यांनी फोटो चा आधार घेऊन शोध घेतला असता, सदर सोन्याचे दागिने व पैसे हे साईभक्त श्री. प्रमोद सिंह रा. मिर्झापूर ( उत्तरप्रदेश ) यांचे असल्याचे निष्पन्न झाले.

दागिने आणि पैसे हरवल्यानंतर साईभक्त प्रमोद सिंह यांच्या पत्नी रडायला लागल्या. परंतु जेव्हा साईबाबा संस्थान चे कर्मचारी हरवलेला किंमती ऐवज परत घेऊन गेले तेव्हा त्यांच्या चेहऱयावर हास्य आले. संस्थान कंत्राटी कर्मचारी श्री केशव गोरे हे अठरा हजार रु मासिक पगारावर नोकरी करत आहेत.

सुमारे दोन लाखाचा ऐवज सापडून देखील त्यांनी मोह न ठेवता परत केला. हा त्यांचा प्रामाणिकपणा निश्चितच साईबाबा संस्थानच्या नावलौकीत भर घालेल यात शंका नाही.

प्रामाणिक कर्मचारी श्री. केशव गोरे यांचे साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भीमराज दराडे व साईआश्रम भक्तनिवास चे प्र. विभाग प्रमुख श्री विजय वाणी, कामगार अधिकारी शरद डोखे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button