Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
क्राईमशिर्डी

शिर्डीत माणुसकीला काळिमा फसवणारी घटना फक्त 150 रुपयांसाठी एकाला जीव गमावावा लागला

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी येथील नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स समोर मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात केवळ 150 रुपयांच्या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स समोर मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात केवळ 150 रुपयांच्या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मृत व्यक्ती खंडोबा कॉम्प्लेक्सच्या बंद असलेल्या दुकानांसमोर झोपलेली होती. त्याचवेळी तिघेजण तिथे आले आणि त्याच्या खिशात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न करू लागले. झोपेतून जागे झाल्यावर पीडित व्यक्तीने त्यांना विरोध केला. यामुळे त्यांच्यात झटापट सुरू झाली. यावेळी एका आरोपीने जोरदार कानशिलात लगावली.

त्यामुळे तो जमिनीवर पडून बेशुद्ध झाला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे.हा सर्व प्रकार मध्यरात्री घडला असून रात्री राऊंडवर असलेल्या पोलीस पथकाला संबोधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जमिनीवर पडलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले.

तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर याभागातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीनही आरोपींची ओळख पटवण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक चौकशीत एकजण सिन्नर (नाशिक) येथील दुसरा हिंगोली जिल्ह्यातील आणि तिसरा कोल्हार, नगर जिल्हा येथील असल्याच पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तो भीक मागणारा असावा किंवा स्थलांतरित मजूर असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या BNS 105 कलमान्वये ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिर्डी पोलीस अधिक तपास करत असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच आरोपींचा मागील गुन्हेगारी इतिहास देखील तपासला जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button