Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

इतकी मोठी कारवाई होऊनही गुटखा विक्री तेजीत शिर्डीत विविध कंपनीचा गुटखा जप्त! एका गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी) 

sai nirman
जाहिरात

महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असताना सर्रासपणे गुटखा विक्री होत आहे.तशी यासंदर्भात सध्या मोठी चर्चा सुरू असल्यामुळे स्थानिक गुन्हा विभागाकडुन शिर्डीत गुटखा तस्करांवर कारवाई करण्यात येत आहे.शिर्डी मध्ये नुकताच बंदी असणारा गुटखा पकडण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DN SPORTS

kamlakar

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, १० मे 2025 रोजी सव्वा पाच वाजेच्या दरम्यान साईप्रसादाल शिर्डी जवळील हॉटेल प्रसाद रेस्टॉरंट  समोर तांबोळी पान स्टॉल नावाच्या टपरीमध्ये डायरेक्टर स्पेशल पान मसाला, रजनीगंधा विमल पान मसाला , किर कोकील छाप तंबाखू मिराज, अशा कंपनीचा गुटखा मोठ्या प्रमाणात सापडला आहे.

हजारो रुपयाचा हा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून  धाड टाकून जप्त केला आहे. या याप्रकरणी साजिद बशीर तांबोळी राहणार श्रीराम नगर शिर्डी यास ताब्यात घेण्यात आले असून त्यावर गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 526/ 2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 123 /223/ 274 /275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

यापूर्वीही दैनिक साई दर्शनच्या  माहितीमुळे लाखो रुपयाचा गुटखा पोलिसांनी पकडला आहे. गुटखा तस्करांवर कारवाई होत असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button