Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

लग्नला नकार देत चक्क महिलेच्या डोक्यात दारूची बॉटल फोडली गुन्हा दाखल

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथील कालिका नगर मध्ये राहणाऱ्या एका महिलेला येथीलच एका पुरुषाने दारूची रिकामी बाटली डोक्यात मारून जखमी केलं व शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद्र शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आल्यामुळे शिर्डीत महिला आता असुरक्षित झाले की काय?

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे. या प्रकरणासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील कालिका नगर येथे राहणारी रूपाली वाल्मीक गोतीस यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की,मी एकटीच आली कालिकानगर भागात राहत असुन त्यावर माझी उपजिवीका भागविते. साई रमेश शेलार रा. बाजारतळ, शिर्डी ता. राहाता हा माझ्या ओळखीचा आहे. तो यापुर्वी माझ्याकडे येत असे.

त्यावर त्याची व माझी मैत्री होती. परंतु त्याने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे मी त्यासोबत बोलत नव्हते. त्याबाबत मी त्याचे घरच्यांना सांगितले होते.
दि. 27/04/2025 रोजी रात्री 12/00 वा.चे. सुमारास मी भाजीमंडई जवळ सौंदडीबाबा रोडने माझ्या स्कुटीने घरी जात असतांना तेथे मला साई रमेश शेलार रा. बाजारतळ, शिर्डी ता. राहाता हा दारु पिलेल्या अवस्थेत भेटला व मला म्हणाला की,

मला घरी घेवुन चल. त्यानंतर त्याने माझ्या मोबाईलमधील सिमकार्ड तोडून टाकले .त्यावरुन मी त्याचे घरी जावुन त्याची आई लक्ष्मीबाई यांना झालेल्या प्रकाराबाबत सांगितले. त्यावेळी तो तेथे आला व मला म्हणाला की तुझ्या गाडीतले पेट्रोल संपले आहे .आपण साकुरी शिव येथुन पेट्रोल घेवुन येवु असे म्हणून आम्ही साकुरी शिव येथील पेट्रोल पंप येथे गेलो असता

तेथे त्याने पेट्रोल न घेता दारुची बॉटल माझे डोक्यात मारली. त्यामुळे माझ्या डोक्यात जखम झाली व शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी मारहाण केली. व मला म्हणाला की तु जर मला दिसली तर मी तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली. व माझा मोबाईल फोडून टाकला. त्यामुळे मी पायी पायी येत असतांना तेथे जमलेल्या लोकांनी सोडवासोडव केली. व मी एका रिक्षास हात करुन शिर्डी पोलीस स्टेशनला आले.

त्यामुळे
साई रमेश शेलार याने माझ्याशी वाद करुन माझ्या डोक्यात दारुची रिकामी बॉटली मारुन जखमी केले व शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देवुन माझा मोबाईल फोडुन नुकसान केले आहे. अशा आशयाची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात रूपाली वाल्मीक गोतीस यांनी दाखल केली आहे. या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button