Letest News
भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा
क्राईमशिर्डी

दरोड्यात जखमी झालेल्या महिलेचेही निधन! भोसले कुटुंबातील सर्वच तीन सदस्य या दरोड्यात मारले गेली  

शिर्डी (प्रतिनिधी ) शिर्डीच्या काकडी विमानतळा जवळ पडलेल्या दरोड्यांमध्ये दोन जण ठार झाले होते तर एक महिला जखमी झाली होती या जखमी महिलेचे उपचार घेत असताना निधन झाले आहे त्यामुळे या दरोड्या ठार झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. विशेष म्हणजे भोसले कुटुंबातील सर्वच तीन सदस्य या दरोड्यात मारले गेल्याने या भोसले कुटुंबाचा वंश नाहीसा झाला आहे हे दुःखद घटना सर्वांनाच अतिशय वेदना देणारी ठरत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ शेतकरी भोसले कटूंबिय गुण्यागोविंदाने राहत होते. पण अचानक काळाचा घेरा पडला आणि हे कुटुंब उद्ध्वस्त झाले. भोसले वस्तीवर दरोडा पडला होता या दरोड्यात दोन जण ठार व एक महिला जखमी झाली होती.


या घटनेत साहेबराव पोपट भोसले, कृष्णा साहेबराव भोसले यांना जिवे मारण्यात आले होते. तर साखरबाई साहेबराव भोसले यांना गंभीर मारहाण करण्यात आली होती.उपचार चालू असताना साखरबाई(वय ५५) यांचा रविवारी (दिनांक १३ ) पहाटे पाच वाजता मृत्यू झाला आहे.सलग आठ दिवस साखरबाई यांची मृत्युशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आहे. या कुटुंबातील तिघांचाही मृत्य झाल्याने संपुर्ण कुटुंबाचा अस्त झाला .


संदिप दहाबाड (वय १८) व जगन काशिनाथ किरकिरे (वय २५) या दोन तरुणांना काकडी शिवारात मकाची कुट्टी करून जनावरांचा चारा मुरघास बनविण्याचे कामासाठी भोसले यांचे नातेवाईकांनी या दोघा तरुणांना काकडी शिवारात आणले होते . बरेच दिवस ते दोघे या ठिकाणी काम करता करता अनेक शेतकऱ्यांकडे कामानिमित त्यांचे जाणे येणे सुरू होते. साहेबराव भोसले यांचा दुग्ध व्यवसाय असल्याने त्यांचा मुरघास या तरुणांनी बनवून दिला.

त्यामुळे ओळख वाढल्याने भोसले यांचे घरी त्यांचे जाणे येणे सुरू होते . ज्यावेळी साहेबराव किवा कृष्णा घरात नसेल त्यावेळी ते दोघे पाणी पिण्याचे निमित्ताने घराची सर्व झाडा झडती घेत असत. घरात काय कुठे आहे, चोरी केल्यास किती माल मिळेल याची सर्व माहिती त्यांनी घेतली. परंतु हि गेम कधी वाजवायची हा गोंधळ त्यांचे मनात सुरु होता.

जाताना मोठा माल घेवून जावू असे ते दोघे स्वप्न रंगवत असताना काकडी शिवारातले मुरघासाचे काम संपले म्हणून घरी परतायचे असल्याने अखेर त्यांनी ५ एप्रीलची रात्र निवडली. रात्री पासुनच भोसले यांच्या घराचे आसपास दबा धरून बसलेल्या या दोघांनी पहाटेच्या वेळी भोसले यांचा दरवाजा ठोठावला. ओळखीच्या कामगारांचा आवाज आहे म्हणून दरवाजा उघडला असता दोघांनी आपल्या जवळील टणक हत्यार व पावड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली

गंभीर दुखापत झाल्यानं कृष्णा व साहेबराव निपचित रक्ताच्या थारोळ्यात पडले. पत्नी साखरबाई यांनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या या घटनेनंतर हे दोघे दरोडेखोर मोटार सायकल, मोबाईल व सोने घेवून पसार झाले.


पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली दरोडेखोरांनी भोसले यांचा मोबाईल चोरुन नेला.चोरी झालेला मोबाईल लोकेशन वर टाकला परंतू मोबाईल बंद असल्याने लोकेशन दाखवत नव्हता अखेर दुपार नंतर आरोपींनी आता धोका नाही अशी खात्री झाल्याने सिन्नर येथील पळसे टोल नाक्या नजिक मोबाईल चालु केला.

पोलीसांना मोबाईल लोकेशन मिळताच सिन्नर पोलीसांच्या मदतीने अवघ्या काही तासात दोघाना जेरबंद करण्यात यश आले आहे. दोन दरोडेखोर पकडले मात्र या दरोड्यांमध्ये तीन जण ठार झाले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button