Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
क्राईमशिर्डी

साई मंदिराच्या सुरक्षेला बाधा चक्क साई मंदिराचे व्हिडिओ व्हायरल शिर्डी येथील धक्कादायक प्रकार

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील
साई समाधी मंदिरात परवानगी नसताना व्हिडिओ शूटिंग करून सोशल मीडियावर इंस्टाग्राम या माध्यमातून सगळीकडे व्हायरल होत आहे.या व्हिडिओची साई संस्थांनने सखोल चौकशी व्हावी. व यात कोणी दोषी आढळला तर त्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी शिर्डीतील ग्रामस्थांनी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित दादा पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आदींना पाठवलेल्या निवेदनात म्हटले की,
सध्या सोशल मीडियावर इंस्टाग्राम या माध्यमातून साई नाईन कॉइन हे अकाउंट असून यावर 15 जानेवारी 2025 पासून साई मंदिर गाभारा व मंदिर परिसरात शूट केलेला एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. शिर्डीच्या साई समाधीमंदिर परिसरामध्ये फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी ची परमिशन नसताना हा व्हिडिओ कसा काढला गेला.

व तो व्हायरल होत आहे. आपण या व्हिडिओतील व्यक्तीला सदर व्हिडिओ ग्राफी करण्याची परमिशन का दिली का?याची आम्हाला माहिती हवी आहे, कारण या व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून साईमंदिर सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित होत आहे. तरी आपणा या व्हिडिओतील व्यक्तीवर कडक कारवाई करावी .अशी आम्ही समस्त शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आपणाकडे या निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत.

तरी आपण याकडे विशेष लक्ष घालून या संदर्भात अधिक चौकशी करावी व दोष आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी . अशी मागणी करण्यात आली आहे.संस्थांनाला व प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकावर शिर्डीतील युवानेते विकास गोंदकर अविनाश गोंदकर चेतन कोते प्रकाश गोंदकर महेश गोंदकर अमोल कोते आदींच्या सह्या आहेत

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button