Letest News
गुटखा तस्करांवर एलसीबीची वक्रदृष्टी शिर्डीत एकाच रात्री तीन गुन्हे दाखल! दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव... साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा... सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार!१९ वर्षांच्या न्यायसंघर्षाला नवी दिशा तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!... शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर आता बुलडोझर ६० दिवसांत कारवाईचे आदेश शिर्डी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा
अ.नगरराजकीय

ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपर वरच निवडणुका घ्या! सिमोन ठकाजी जगताप

शिर्डी ( प्रतिनिधी) सध्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या .त्या ईव्हीएम मशीन द्वारे निवडणुका घेण्यात आल्या. मात्र अनेक ठिकाणी मशीन बाबत साक्षमता निर्माण झाली असून तशी चर्चा राज्यात सुरू आहे. अनेकांनी येथून पुढील सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) घेण्याचे मागणी केली आहे.
अशी मागणी यापूर्वीच 30 डिसेंबर 2024 रोजी राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथे झालेल्या ग्रामसभेत ठरावाद्वारे करण्यात आली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


‌ राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत असून येथे 30 डिसेंबर 2024 रोजी ग्रामसभा संपन्न झाली.
या सभेमध्ये ईव्हीएम मशीन ऐवजी सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. अशी मागणी करण्यात आली होती.
सिमोन ठकाजी जगताप यांनी ग्रामसभेत याविषयी सूचना केली,व शामकांत भाऊसाहेब कातोरे यांनी त्यास अनुमोदन दिले होते .त्यावर उपस्थित ग्रामस्थांमध्ये साधक बादक चर्चा होऊन हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.

या ग्रामसभेतील ठराव क्रमांक पाच तीन नुसार हा ठराव संमत झाला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावेत.अशी मागणी निमगाव कोऱ्हाळे ग्राम सभेत करण्यात आली होती व ती मंजूर झाली होती. ग्रामस्थांचे म्हणणे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असेच होते. असे यावरून दिसते. पण ही मागणी शासनाने, निवडणूक आयोगाने मनावर घेतली नाही.

त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वर अनेक ठिकाणी संशय निर्माण होत आहे. तशी चर्चा होत आहे. जर ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर या निवडणुका झाल्या असत्या तर अशी सरकार ,व निवडणूक आयोग याविषयी संशयास्पद भूमिका नागरिकांची राहिली नसती.

येथून पुढील निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात . यात निवडणूक आयोगाची अडचण काय आहे? असा सवालही त्यांनी केला असून येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात. अशी परत एकदा मागणी सिमोन ठकाजी जगताप यांनी प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकाद्वारे केली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button