Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
अ.नगरराजकीय

श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार!वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन!

शिर्डी ( प्रतिनिधी) संपूर्ण विश्वात शिर्डी एक प्रसिद्ध देवस्थान म्हणून गणले जात आहे. अशा प्रसिद्ध देवस्थानचा साई संस्थान विश्वस्त व्यवस्था कारभार पाहत आहे. या साई संस्थांनमध्ये मोठ्या संख्येने अधिकारी ,कामगार असून या कायम कामगारांची श्री साई संस्थान कर्मचारी सोसायटी ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल असणारी‌ एक संस्था आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अशा या संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव तुकाराम पवार यांचा गुरुवार 23 जानेवारी 2025 रोजी वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस आज गुरुवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विठ्ठलराव उर्फ माऊली यांना प्रत्यक्ष भेटून सत्कार करण्यात येत आहे. मोबाईलवर सोशल मीडियावर वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात येत आहे.


विठ्ठलराव पवार हे साई संस्थांनमध्ये नोकरीला असून ते नुकतेच श्री साई संस्थान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत आपल्या पॅनल उभा करून घवघवीत यश संपादन करत चेअरमन झाले आहे. ते मागील संचालक मंडळातही संचालक होते. ते संचालक असो चेअरमन असो की नसो, मात्र त्यांचे सभासदांसाठी काम नेहमी सुरू असते.

ग्राउंड लेव्हल ला संस्थान कर्मचारी ,सोसायटी सभासद ,सोसायटीचे कर्मचारी यांच्या समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. सोसायटी मार्फत अनेक चांगले व धाडसी निर्णय त्यांनी आपल्या संचालक मंडळाच्या विश्वासाने घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे सर्व सभासद व कर्मचाऱ्यांमधून स्वागत होत आहे.

जरी या सोसायटीत चेअरमन असले तरी आपण संस्थांनचे कर्मचारी आहोत. असे समजून ते आपले कामही प्रामाणिकपणे साईंची सेवा म्हणून करत असतात. अगदी साधी राहणीमान, मोजके पण मुद्देसूद बोलणे, सर्वांशी आपुलकीने वागणे, स्पष्ट वकृत्व, असा त्यांचा स्वभाव आहे. आपले प्रामाणिक काम करत असताना ते सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक या कार्यातही नेहमी अग्रेसर असतात. साईबाबांच्या पालख्या व साई पदयात्रांसाठी त्यांची नेहमी धडपड असते.

त्यासाठी त्यांनी आपल्या कणकुरी गावी साई पालखी निवाराही बनवला आहे. शिर्डी परिक्रमा असो की आषाढी एकादशीला पंढरपूर पायी वारी असो, त्यामध्ये त्यांचा सहभाग असतो.
त्यांनी या वर्षी आषाढी एकादशीची पंढरपूर वारी केली आहे. त्यांच्या या सर्व कामाची व अध्यात्मिक कार्याची खुद्द सरला बेट चे महंत ह भ प रामगिरीजी महाराज यांनी सुद्धा ते चेअरमन झाल्यानंतर त्यांचा आशीर्वाद रुपी सन्मान करताना प्रशंसा केली आहे.


साई संस्थांनमध्ये प्रामाणिक नोकरी, श्री साईबाबा कर्मचारी सोसायटीमध्ये चेअरमन म्हणून विविध जबाबदारी यशस्वी पार पडत असताना आपली शेतीही ते मोठ्या कुशलतेने सांभाळतात.
संस्थान कर्मचारी असो की, नातलग असो की, मित्रपरिवार असो कोणाच्याही दुःखामध्ये, सुखामध्ये ते सहभागी होतात. म्हणूनच त्यांचा मोठा मित्रपरिवार असून त्यामुळे त्यांना वाढदिवसानिमित्त आज गुरुवारी सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ठीक ठिकाणी सत्कार होत आहे. विठ्ठलराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. श्री साई संस्थान एम्पलॉइस क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांना वाढदिवसानिमित्त दैनिक साई दर्शन परिवाराच्या वतीनेही हार्दिक शुभेच्छा आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button