Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डी शाळेचे गणित, विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शनात घवघवीत यश

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पाथरे बुद्रुक येथे नुकत्याच आयोजित राहाता तालुकास्तरीय गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनात श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्राथमिक विभागातील चि. चैतन्य सुयोग वाणी याने इयत्ता १ली ते ५वी गटातील विज्ञान गटात द्वितीय क्रमांक पटकावला, तर चि. अर्थव मच्छिंद्र खैरनार याने इयत्ता ६वी ते ८वी गटातील विज्ञान गटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना श्रीमती चारुशिला घाडगे आणि श्री अमोल निर्मळ यांचे मार्गदर्शन लाभले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

राहाता तालुक्यातील जवळपास १०५ शाळांनी सहभाग घेतलेल्या या प्रदर्शनात एकूण २६२ उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले होते. प्रदर्शनाचा समारोप तिसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण सोहळ्याने झाला. प्रमुख पाहुणे सौ. धनश्रीताई सुजय विखे पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. या वेळी राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री राजेश पावसे व इतर मान्यवर उपस्थित होते.विशेष बाब म्हणजे, चि. अर्थव मच्छिंद्र खैरनार याची जिल्हास्तरीय गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्‍कूल, शिर्डीचे या यशाबद्दल मा.तदर्थ समितीच्‍या अध्‍यक्षा मा.श्रीमती.अंजू शेंडे (सोनटक्‍के) प्रधान जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश, अहिल्‍यानगर, मा.श्री.सिध्‍दाराम सालीमठ (भा.प्र.से) जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य, तदर्थ समिती तसेच, मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से), उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री संदिपकुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी श्रीमती.प्रज्ञा महांडुळे-सिनारे, श्री विश्‍वनाथ बजाज, व लेखाधिकारी श्री अविनाश कुलकर्णी तसेच, शाळेचे प्राचार्य, श्री आसिफ तांबोळी (माध्‍यमिक विभाग) व मुख्‍याध्‍यापिका (प्राथमिक विभाग) सौ.शिल्‍पा पुजारी, यांनी गुणवंत विदयार्थ्‍यांचे अभिनंदन केले

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button