Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
अ.नगरराजकीय

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि, शिडीचे नैसर्गिक विमा कवच पोटी

बातमी संस्था ही श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे कायम कर्मचाऱ्यांची नोंदणीकृत सहकारी संस्था असुन संस्थेमार्फत संस्थेच्या सभासदांकरीता अनेक उपक्रम राबविले जातात. त्यानुसारच नुतन चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पा. पवार यांचे संचालक मंडळाने निवडणुकीमध्ये जामीनदार मुक्त संस्था करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार संस्था व सभासद यांचे प्रत्येको ५० टक्के रक्कमेतुन जामीनदार मुक्त संस्था होणे करीता नैसर्गिक मृत्यु विमा कवच प्राप्त होणे कामी प्रत्येक सभासद व संस्थेचे कर्मचारी यांचा नैसर्गिक मृत्यु विमा प्रत्येकी रु.१० लाखाचा घेवून एक ऐतिहासीक निर्णय घेतला व तो राबविला. संस्थेच्या सभासदांचा अथवा कर्मचारी यांचा कोणत्याही प्रकारचा मृत्यु झाल्यास त्यांचे वारसास संस्थेचे येथे कर्ज बाकी वजा जाता शिल्लक रक्कम याद्वारे मिळणार आहे. परंतु दुदैवाने माहे नोव्हेंबर २४ ते जानेवारी २५ या कालावधीत संस्थेचे कै. रावसाहेब प्रभाकर गाडेकर, कै. कांता बाबुराव देशमुख व कै. सुरेश तान्हाजी हुसळे यांचा मृत्यु झाला. नुकतेच तिनही क्लेम मंजूर इ गालेले आहेत. त्यातील कै. रावसाहेब प्रभाकर गाडेकर यांचे नावे संस्थेचे संपूर्ण कर्ज सदरचे विमा रक्कम रु.१० लाखातुन वर्ग करण्यात आल्याने त्यांचे जामीनदार पुर्णपणे या कर्जातून मुक्त झालेले आहेत. तर कै. कांता बाबुराव देशमुख यांचे कोणतेही कर्ज नसल्याने संस्थेचे त्यांचे वारसास आज दि.२०/०१/२०२५ रोजी संस्थेच्या व्यवस्थापन कमीटी सभेप्रसंगी त्यांना चेकद्वारे रु.१० लाखाचा चेक प्रदान करण्यात आला. तर कै. सुरेश तान्हाजी हुसळे यांचेकडे संस्थेचे कर्ज बाकी असल्याने सदरचे विमा रक्कमेतुन सदरचे कर्ज वसुल होवून त्यांचे वारसांनाही आज दि.२०/०१/२०२५ रोजी संस्थेचे कमीटी सभेत रु.९ लाख ४१ हजार चेकद्वारे प्रदान करण्यात आले. या विमा योजनेमुळे जामीनदार हे पूर्णपणे सुरक्षीत झालेले असून त्यांचे कर्ज ही पुर्णपणे सुरक्षीत झालेले असल्याने संस्थेची थकबाकोही राहणार नाही. त्यामुळे संस्थेच्या सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याकामी एक्सपेरिटस इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. या कपंणीचे प्रतिनिधी श्री हितेश टक्कर साहेब, व श्री जयेश पांडे साहेब यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.

sai nirman
जाहिरात

मयत सभासदांचे वारसांना विमा चेक प्रदान करतांना प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन श्री पोपटराव कोते संचालक श्री महादु कांदळकर, श्री कृष्णा आरणे, श्री भाऊसाहेब कोकाटे पा., श्री संभाजी तुरकणे पा., श्री देविदास जगताप, श्री विनोद कोते पा.. श्री मिलींद दुनबळे, श्री तुळशिराम पवार पा.. श्री रविंद्र गायकवाड, श्री भाऊसाहेब लवांडे पा., श्री इकबाल तांबोळी, श्री गणेश आहिरे, सौ. सुनंदा जगताप पा.. सौ. लता बारसे पा., श्री रंभाजी गागरे, तज्ञ संचालक श्री भाऊसाहेब लबडे पा. तसेच सचिव श्री नबाजी डांगे, सह. सचिव श्री विलास वाणी तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button