Letest News
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा...
अ.नगरशिर्डी

साई संस्थांनच्या निरोपोगी डेट स्टॉक साहित्याचा 9 जानेवारीला जाहीर लिलाव! आठ जानेवारीला सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनामत भरण्याची मुदत!!

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथील साई संस्थानच्या निरुपयोगी डेट स्टॉक साहित्यांचा जाहीर लिलाव गुरुवार 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता साई आश्रम ,भक्त निवास परिसरातील मंडपात करण्यात येणार असून ज्यांना या लिलावात सहभाग घ्यायचा आहे. त्यांनी संस्थांनच्या लेखा शाखेत एक दिवस अगोदर म्हणजे आठ जानेवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनामत रक्कम 50 हजार रुपये रोख भरावी. असे आवाहन साई संस्थांननी एका प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की,सर्व व्‍यापा-यांना विनम्र आवाहन करण्‍यात येते कि, श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीमार्फत निरुपयोगी डेडस्‍टॉक साहित्‍यांचा जाहीर लिलाव गुरुवार, दि.०९/०१/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्‍थानचे श्री साईआश्रम भक्‍तनिवास परिसरातील मंडपात आयोजित करण्‍यात आलेला आहे. सदर लिलावात विक्री करावयाच्‍या निरुपयोगी डेडस्‍टॉक साहित्‍यांचा तपशिल पुढीलप्रमाणे लॉट क्रं.०१-अ) श्री साईप्रसादालयाकडील जुन्‍या नादुरुस्‍त चपाती मशिन्‍स- ०५ नग ब) श्री साईप्रसादालयाकडील जुने एक डिश वॉशिंग मशिन- नग-०१ लॉट क्रं.०२- डेडस्‍टॉक नादुरुस्‍त मशिनरी व इक्‍युपमेंट-१५ नग, वॉटर कुलर्स-३६ नग, स्‍प्‍लीट ए. सी. -४५ नग, फ्रिज/ बॉटल कुलर – ०८ नग, स्‍टॅबिलायझर व एअर कुलर्स – ११ नग, आर. ओ. प्‍लॅन्‍ट – ५३ नग, इतर मशिनरी – ११ नग, मोटार व ब्‍लोअर – ०८ नग, हॉट वाटर सोलर सिस्‍टम – ०१ नग, पिठाचे चक्‍की युनीट – ०५ नग, लॉट क्रं.०३- नादुरुस्‍त तांत्रिक साहित्‍य– अ) साऊंड सिस्‍टीम साहित्‍य – ९१ नग आ) इलेक्‍ट्रीकल/इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्‍य– ४ नग, लॉट क्रं.०४- नादुरुस्‍त झेरॉक्‍स मशिन – ०४ नग, लॉट क्रं.०५- a) लेदर चेअर (CRC Pipe,SS Finishing Plated Iron Lather Chairs) – २५० नग + b) सोफा (तपकिरी रंगाचा लेदर कुशन सोफा) १० नग c) निरुपयोगी डेडस्‍टॉक व किरकोळ डेडस्‍टॉक साहित्‍य- २२७९ नग, लॉट क्रं.०६- निरुपयोगी विद्युत उपकरणे- सिलिंग फॅन-१३९९ नग, वॉल फॅन/एक्झॉस्ट फॅन/स्टॅण्ड फॅन/टेबल फॅन ३१३ नग, गिझर -६० नग, पॅनेल/जनरेटर-२९ नग, मेटल वस्तु-१४८ नग, लॉट नं ०७ – मेडीकल उपकरणे/डेडस्‍टॉक साहित्‍य- ६७ नग, लॉट नं.०८ मेडीकल उपकरणे/डेडस्‍टॉक साहित्‍य-१६० नग, लॉट नं.०९- सीसीटीव्‍ही केबल,कॅमेरे, व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे/निरुपयोगी वस्‍तु/तांत्रिक साहित्‍य-१३५ नग, लॉट नं.१० – खराब लाकडी दरवाजे- ९२७ नग सदर साहित्‍य संस्‍थानचे श्री साईआश्रम भक्‍तनिवासस्‍थान येथे दि.०७/०१/२०२५ पासुन पाहणीसाठी उपलब्‍ध करण्‍यात आलेले आहे.
ज्‍या व्‍यापा-यांना उपरोक्‍त साहित्‍य खरेदी करावयाचे आहे त्‍यांनी संस्‍थानच्‍या लेखाशाखेत एकदिवस अगोदर म्‍हणजेच दि.०८/०१/२०२५ सायं. ५.०० वाजेपर्यंत अनामत रक्‍कम रु.५०,०००/-मात्र रोखीने भरावी. निरुपयोगी भंगार साहित्‍य जाहिर लिलावाबाबत शर्ती-अटी, इतर माहिती संस्‍थानचे अधिकृत संकेतस्‍थळ www.sai.org.in (Tenders) वर पहावयास उपलब्‍ध असल्‍याचे आवाहन संस्‍थान प्रशासनाने या पत्रकाद्वारे केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button