
शिर्डी : नामदार रामदास आठवले यांना पंतप्रधानमंत्री मोदी यांनी तीन वेळा संसदेत मंत्रीपदाची संधी दिली आहे.
ना. आठवले सामाजिक न्याय मंत्रालयाचा कारभार चांगल्या पद्धतीने करत आहे. त्यांचे काम देशात मोठे असून सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यासाठी मी साईबाबांच्या दर्शनाला आले असल्याचे मंत्री आठवले यांच्या अर्धांगिनी सीमाताई यांनी सांगितले.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत त्यांनी नातलगांसोबत साईंच्या मध्यान्य आरतीस हजेरी लावली. ज्या प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयता नष्ट करण्यासाठी योगदान दिले आहे तसेच स्थान शिर्डी असून या ठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक देशभरातून येत असतात.

साई संस्थानचे संरक्षण प्रमुख कैलास शेजवळ, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी चोख व्यवस्था ठेवली. ह्यावेळी सिमताई यांचे माणसपुत्र आकाश शेजवळ, नाना त्रिभुवन उपस्तिथ होते