Letest News
शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल
राजकीयशिर्डी

परिक्रमेचा प्रचार, प्रसार व नियोजन जोमाने सुरू!

शिर्डी (प्रतिनिधी)
ग्रीन एन क्लिन शिर्डी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या १३ फेब्रुवारीला शिर्डी महापरिक्रमा आयोजित करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा सोहळा सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक व भाविकांनी उपस्थिती दर्शविली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विखे यांच्या हस्ते महापरिक्रमेची विधिवत उद्घोषणा करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी महापरिक्रमेच्या माध्यमातून अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक
एकात्मतेचा संदेश दिल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमादरम्यान भजनांच्या सुरेल तालावर तयार झालेल्या आनंदमय वातावरणात मान्यवर आणि ग्रामस्थांसमवेत सहभाग घेत पाहुली या पारंपरिक नृत्याचा आनंद घेतला व सोहळ्याची रंगत वाढविली.


शिर्डी महापरिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे गव्हाच्या पिकांची पाहणी आणि चित्रीकरण करणे. त्यामुळे सोहळ्यास उपस्थित सर्वांनी शिर्डी परिक्रमेच्या निमित्ताने शेतांमधील गव्हाच्या पिकांची पाहणी केली. तसेच परिक्रमेदरम्यानच्या दृश्यांचे चित्रीकरण देखील करण्यात आले.त्याद्वारे या अनोख्या परंपरेचा अनुभव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

या सोहळ्याला श्री साईबाबा संस्थानचे
मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे, शिर्डी पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक कुंभार महंत काशिकानंदजी सरस्वती महाराज, ग्रीन एन क्लीन शिर्डीचे अजित पारख, तसेच अभयराजे
शेळके, गोपीनाथ गोंदकर, दिगंबर कोते, न्यायविधी तज्ञ् अनिल शेजवळ, गणेश कोते, डॉ. जितेंद्र शेळके, नितिन शेळके, प्रताप जगताप यांसारख्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

यावेळी विखे यांनी शिर्डी महापरिक्रमा हा उपक्रम केवळ धार्मिक सोहळा नसून, तो सामाजिक एकात्मता आणि निसर्गप्रमाचा संदेश
देणारा सोहळा आहे, असे स्पष्ट केले. तसेच सर्व उपस्थितांनी शिर्डी महापरिक्रमेला भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या संकल्पाने सदरील कार्यक्रमाची सांगता केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button