Letest News
तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!... शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर आता बुलडोझर ६० दिवसांत कारवाईचे आदेश शिर्डी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ
अ.नगरशिर्डी

संगमनेरचे नवनिर्वाचित व जॉईंट किलर समजणारे आमदार अमोल खताळ यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साई दर्शन!

शिर्डी ( प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील चुरशीच्या व प्रतिष्ठित अशा समजल्या जाणाऱ्या
संगमनेर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी आज रविवारी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व चाळीस वर्षे सत्तेत असणारे आमदार बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून विजयी झालेले जॉईंट किलर समजले जाणारे आमदार अमोल खताळ यांनी आज रविवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत त्यांचा परिवार ही होता.व कार्यकर्त्यांचा मोठा गराडाही त्यांच्या समवेत होता.


आ.अमोल खताळ यांनी डोक्यात भगवी टोपी घातलेली होती. ही भगवी टोपी एका कार्यकर्त्यांनी दिलेलीअसून ती त्यांची एक आता ओळख झाली आहे. आमदार अमोल खताळ यांना शिर्डीत‌ अनेकांनी प्रत्यक्ष भेटून हस्तांदोलन किंवा गळा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.


तसेच चाहते ,कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. आपण अनेकदा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आलो. निवडणूक निकाला अगोदरही दोन दिवस दर्शनाला येऊन गेलो होतो. साईबाबांचा आशीर्वाद घेतला होता. साईबाबांचा आपण निस्सिम भक्त असून माझ्या व्यवसायालाही साईबाबांचेच नाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button