Letest News
शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन
क्राईमशिर्डी

छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवाराचे साई दर्शनानंतर येथून अपहरण?….

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राज्यभरात राजकीय उलथापालथ सुरु झाल्याचे चित्र दिसत असताना बहुतेक राजकीय पक्षांना बंडखोरांनी नाकात दम आणला आहे. मराठा आरक्षण, अंतर्गत बंडखोरी अशा वेगवेगळ्या कारणांनी उमेदवारांना मतविभाजनाची भीती असतानाच एकाच नावाच्या दोन उमेदवारांमुळेही काही मतदारसंघात मातब्बर उमेदवारांसमोर संकट उभे ठाकल्याचे दिसत आहे. त्यातीलच औरंगाबाद पश्चिम (अ.जा) मतदार संघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असून शिंदेसेनेकडून संजय शिरसाट तर उद्धव ठाकरे गटाकडून राजू शिंदे त्यांच्यात लढत होणार असल्याचे दिसत असताना या मतदारसंघातील राजू धर्माजी शिंदे या अपक्ष उमेदवाराचे त्याची पत्नी दाजी व बहिणीसह चौघांचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरील उमेदवार शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. आजचे संगमनेर मार्गे नाशिकला जात होते यावेळी आपला पाठलाग होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अपहरणकर्त्यांना हुलकावणी देण्याचा मात्र अपहरणकर्त्यांनी समनापूरनजीक त्यांना गाठले. या प्रकरणात एकमेकांच्या नावात साधर्म्य हे एकमेव कारण असल्याचे समोर येत असून उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी करणाऱ्या राजू रामराव शिंदे यांचा या अपहरणाशी संबंध जोडला जात आहे. याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी शून्य नंबरने गुन्हा दाखल करुन तो शिर्डी ला दाखल करण्याचे काम सुरु आहे याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.३) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समनापूरनजीक घडला. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे उमेदवार राजू धर्माजी शिंदे हे त्यांची पत्नी चंद्रकला, बहीण ताराबाई, दाजी किशोर तुपे आणि सहकारी मंगेश जाधव, स्वप्निल शिरसाठ व चालक सुहास बागुल यांच्यासह शुक्रवारी (ता.1) शिर्डीत आले होते. शनिवारी (ता.2) पाडव्याच्या दिवशी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर दिवसभर ते शिर्डीतच थांबले. त्यानंतर रात्रीचा मुक्काम शिर्डी येथे केल्यानंतर आज (ता.3) दुपारी अडीच वाजता ते सर्वजण आपल्या एरटिगा गाडीतून क्रमांक (एम.एच.04/ जी.एच. 4041) या वाहनातून नाशिकला जाण्यासाठी संगमनेरमार्गे निघाले.मात्र, काही वेळातच त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या हुंदई क्रेटासह पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा व अन्य एका वाहनातून आपला पाठलाग होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आपल्या वाहनाची गती वाढवली. मात्र त्यांच्या मागावर असलेल्या त्या वाहनांनी त्यांना संगमनेर तालुक्यातील समनापूरनजीक गाठले. यावेळी तीनही वाहनातून आलेल्या आठ ते दहा इसमांनी त्यांचे वाहन अडवून तुम्ही उमेदवारी मागे घेणार आहात की नाही? असा खडा सवाल केला. त्यावर संबंधित उमेदवाराने ‘हो’ घेणार आहे असे प्रत्युत्तर दिले. मात्र त्यानंतरही काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनातून आलेल्या इसमांनी अपक्ष उमेदवार राजू धर्माजी शिंदे यांच्यासह त्यांची पत्नी चंद्रकला, बहिण ताराबाई व मेहुणे किशोर तुपे यांना बळजबरीने त्यांच्या वाहनातून खाली उतरवून काळा रंगाच्या क्रेटा गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले.याप्रकरणी अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचे सहकारी मंगेश

sai nirman
जाहिरात

जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर

पोलिसांनी शून्य नंबरने गुन्हा दाखल केला असून सदरचा

DN SPORTS

गुन्हा पुढील तपासासाठी शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात

आला आहे. या घटनेत केवळ दोन उमेदवारांच्या नावांमधील

साधर्म्य हे एकमेव कारण असल्याचे समोर येत असून

संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे

गटाच्यावतीने अधिकृत उमेदवारी करणाऱ्या उमेदवाराचे

kamlakar

नावही राजू रामराव शिंदे असे असल्याने त्यांचाच या

प्रकरणात हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला

आहे. या प्रकरणात शिर्डीसह संगमनेर पोलीसही अधिक

तपास करीत आहेत. या वृत्ताने संपूर्ण राज्यातील राजकारण

ढवळून निघाले आहे. ह्याप्रकारणी शिर्डी पोलीस स्टेशनला माहिती घेतली असता पोलीस नाईक दातीर व पोलीस नाईक खेडकर यांनी माहिती दिली कि ह्या प्रकरणाची पोलीस निरीक्षक हे सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

आता काही प्रसार माध्यमानावर ब्रेकिंग दाखवली जात आहे कि तो उमेदवार म्हणतो कि माझे अपहरणं झालेच नाही मग गुन्हा कसाकाय दाखल झालं असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे खरंच अपहरणं झाले कि हे बनाव आहे हे सर्व पोलीस तपासात स्पष्ट होईल

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button