Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
क्राईमशिर्डी

पैसे संपल्याचा बहाणा करत चोरीचे सोने हॉटेल मालकाला हाताशी धरून कोपरगावला विकले!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे एका हॉटेलमध्ये उतरलेल्या व राजस्थान मधून आलेल्या व्यक्तींनी हॉटेल चालक मालकाशी खोटे बोलून कोपरगाव येथे चोरीचे सोने विकून गुन्हा केल्याने व त्याचा आणखी तपास करण्यासाठी राजस्थान पोलीस शिर्डीत व कोपरगाव येथील सोनाराकडे गेल्याची खात्रीशीर माहिती असून या प्रकारामुळे शिर्डी व परिसरात मोठे खळबळ उडाली असून त्याची चर्चाही सध्या आपापसात सुरू असल्याचे दिसून येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या संदर्भात अशी माहिती समजते की,शिर्डी येथील संस्थांनच्या पाचशे रूमच्या मागे असलेल्या एका खाजगी हॉटेल मध्ये काही दिवसा पूर्वी राजस्थानाचे काही लोकांनी शिर्डीत येऊन येथे रूम घेतले होती. तेथे थांबले नंतर त्यांनी हॉटेल मालकाला सांगितले कि, आमच्याकडील पैसे संपले आहेत.

आमच्याकडे जाण्यासाठी पैशे शिल्लक नाहीत .आमच्याकडे सोने आहे ते विकायचे आहे. ‌आपल्या परिचयाचे कोणी सोनार असेल तर सांगा, तेव्हा हॉटेल मालक पवार यांनी त्यांना कोपरगाव येथे सोनाराकडे नेले आणि त्यांच्याकडील सोने विकले आणि ते त्या सोनाराकडून पैसे घेऊन निघून गेले‌ .त्यानंतर त्यांना राजस्थान पोलीसांनी सोने चोरी प्रकरणात अटक केली

आणि त्यांच्याकडे सोन्याची चौकशी केली असता त्यांनी आम्ही शिर्डीला गेलो होतो पैसे संपल्याचा बहाणा करत कोपरगावला हॉटेल मालकाला घेऊन तेथे ते सोने विकले आहे. त्यानंतर राजस्थान पोलीस अधिक तपासासाठी त्यांना घेऊन शिर्डीत आले, आणि हॉटेल मालक पवार यास ताब्यात घेऊन कोपरगावच्या त्या सोनाराकडे घेऊन गेल्याचे समजते. दरम्यान शिर्डीत आपापसात तशी चर्चा, कुजबूज सुरू आहे.

शिर्डीत कोण काय उद्देश ठेवून येतो, हे समजत नाही. नवीन चेहरा, नवीन माणसे असल्यामुळे कोण काय करतो, हे लक्षात येत नाही. त्यासाठी प्रत्येकाचे ओळखपत्र घेणे महत्त्वाचे आहे. तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करणे महत्त्वाचे आहे. असे आता सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button