Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरराजकीय

बसचे ब्रेक फेल लाडक्या बहिणी जखमी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे कार्यक्रमासाठी महिलांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. मांजरोणे घाटात बसला अपघात झाला असून या अपघातात नऊ महिला जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांच्या बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. महिलांना घेऊन जाणारी ही एसटी बस चाळीस फूट खोल दरीत कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील काही महिलांना घेऊन येत असताना या बसचा मांजरोने घाटात अपघात झाला. म्हसळा येथून माणगावकडे जाताना बस बाजूच्या दरीत घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातात काही महिला जखमी झाल्या आहेत.

जखमी झालेल्या महिलांवर तातडीने रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात येत आहेत. दरम्यान, एसटी बस चालक नवीन असल्याने मुख्य वळणावरील अंदाज चुकल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button