
शिर्डी प्रतिनिधी
आज शिर्डीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा दौरा होता परंतु मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा शिर्डी दौरा अचानक रद्द झाला आहे दौरा रद्द का झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहि
गेल्या चार पाच दिवसांपासून शिर्डीत माझी लाडकी बहीण योजना व विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमासाठी जय्यत तय्यारी सुरु होती ह्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमासाठी हजेरी लावणार होते त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा अचानक दौरा रद्द झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कार्यक्रमाची कमान सांभाळली
देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले आणि कार्यक्रमा ठिकाणी लाडक्या बहिणींना संबोधित केले आणि विविध विकास कामांचे उदघाटन केले
देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी . ना. राधाकृष्ण विखे, श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.