Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
राजकीयशिर्डी

आओ साई म्हणून साईबाबांना साई नाव देणाऱ्या म्हाळसापती यांची पुण्यतिथी मोठया उत्साहाने साजरी

श्री खंडोबाचे नि:स्सीम भक्त व पुजारी असलेले म्हाळसापती यांनी आपले बहुतेक आयुष्य श्री खंडोबा मंदिर नीं श्री साईबाबा यांच्यासोबत घालवले. म्हाळसापती यांच्या शिवाय साईलाही राहता आले नाही. कारण म्हाळसापतीच्या माध्यमातून बाबांची खरी ओळख साऱ्या जगाला झाली. आणि म्हाळसापतीद्वारा दिलेले “साई” हे नाव सहजतेने बाबांनी स्वीकारले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

कोणतीही औपचारिकता नाही, पूर्वकल्पना नाही, फक्त म्हाळसापतीच्या तोंडून “साई” शब्द बाहेर पडले आणि लोक त्या फकीरला “साई” नावाने हाक मारू लागले. म्हालसापती, कांशीराम शिंपी आणि आप्पा जागले हे तिघे शिडीमध्ये संत, महात्मा, फकिर, मौलवी यायचे त्यांची सारी व्यवस्था करायचे, त्यांची सेवा करायचें,त्यांची सर्व व्यवस्था करायचे आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करायचे.या गोष्टीवर ते लक्ष देत होते.

kamlakar

अंदाजे १८५४ साली एके दिवशी दुपारी काही बैलगाड्या धूपखेडा हून (औरंगाबाद )निघाल्या आणि शिर्डीत दाखल झाल्या. चांद पटेल धुपखेडा गावचे पाटील, गावातील इतर लोक, आणि फकीरासारखा दिसणारा तेजपुंज सुंदरसा तरुणही त्या वऱ्हाडा बरोबर होता म्हाळसापती यांच्या शेतात बैलगाड्या मुक्कामी होत्या,जिथे त्यांचे खळं होते, (खळं म्हणजे शेतातील पीक लावणी करून मळणी करण्याची जागा)


सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त होते, तो तेज पुंज तरुण एकटाच खंडोबाच्या मंदिराकडे चालायला लागला असे मानले जाते की खंडोबा स्वतःच त्यां फकिराला हाक मारतो जणू ते त्यांची वाट पाहत होते,

जेव्हा तो तेजपुंज तरुण खंडोबा मंदिराकडे चालत येतो तेव्हा त्या सत्पुरुषाची व म्हाळसापतीची भेट होती यावेळी जणू काही सर्व ग्रह एकत्र येतात आणि त्यांना जोडतात. तो तेजस्वी तरुण पुढे सरकताच स्वतः म्हाळसापती स्वंय पूजेचे ताट घेऊन मंदिरातून बाहेर येतात.

आणि समोर येऊन म्हणतात “!! या साई !!”त्या दिवसापासून बाबा साई हे नाव स्वीकारतात
साईंसोबत रोज एकटे राहणाऱ्या भक्तांमध्ये म्हाळसापतींचे नाव सर्वप्रथम येते. रोज रात्री साई , म्हाळसापती आणि तात्या रात्री उशिरापर्यंत मशिदीत (द्वारकामाई )कुठल्या ना कुठल्या विषयावर भरपूर गप्पा मारत.

मग तिघेही तिथेच झोपायचे. कधी-कधी रात्री झोपेतून उठल्यावर म्हाळसापतीना म्हणाले की बाबा वर, “मशिदीच्या छतावर जुन्या खुंट्यांनी टांगलेल्या लांबलचक लाकडी फळीवर बाबा झोपलेले दिसायचे,सात-आठ फूट वर, बाबा कधी गेले ? ते कधी खाली आले ?” त्याला कोणी खाली येताना पाहिले नव्हते आणि अगदी मनातल्या मनात म्हाळसापती यांनी बाबांना विचारले होते.पुढे बाबांनी ती फळी तोडून टाकली.

1886 साली मार्गशिर्ष पौर्णिमा च्या दिवशी बाबा तीन दिवस ब्रम्हाडी जाण्यापुर्वी म्हाळसापतींना बाबांनी बोलावून घेतले व बोलले माझ्या पार्थिव नश्वर देहाची काळजी घ्या – मी त्यांना या विश्वात सोडत आहे. मी नक्कीच तीन दिवसांनी परत येईन,असे म्हाळसापती यांना बाबांनी सांगितलं त्यांच्या भक्तीवर बाबांना अपार विश्वास होता.

म्हाळसापती यांच्या मांडीवर डोकं ठेवून बाबांनीं श्वास सोडला – दोन दिवस बाबांचा श्वास परत आला नाही, तेव्हा त्यांच्या मृत्यूची घोषणा झाली. तिसरा दिवस उजाडला तेव्हा गावात हिंदू-मुस्लिम धर्मगुरू तसेच बाबा विरोधी मंडळी मधील तणाव आणखी वाढला. बाबांचा अंत्यविधी करण्याचा अतोनात प्रयत्न झाला परंतु

त्यावेळी म्हाळसापती च्या मागे खंबीर पणे हे महान साईभक्त तात्याबा , रामचंद्रदादा, शामा, काशीराम शिंपी या सारखे बरेच साई भक्त उभे राहिले. काही मुस्लिमांनी व बाबा विरोधी मंडळी नी बाबांना जाळून अथवा दफन करण्याची पूर्ण व्यवस्था केली होती. पण म्हाळसापतीना पूर्ण विश्वास होता, की बाबांचा शब्द कधीच खोटा होत नाही

– जोपर्यंत कोपरगाव दरबाराचे (कोर्ट) अधिकारी येत नाहीत;तोपर्यंत मृतदेह कोणाच्याही ताब्यात दिला जाणार नाही असा पवित्रा सर्व भक्तांनी घेतला या वादातच तिसरा दिवस पूर्ण झाला नीं बाबांनी डोळे उघडले आणि म्हाळसापतींकडे पाहून म्हणाले, ” जात नाही, कोणीही दुनिया पासून दूर चालत”!.


खऱ्या भक्तीचा परिचय देऊन म्हाळसापतीने साईबाबांचे मस्तक तथा डोकं तीन दिवस जमिनीवर ठेवले नाही. आणि ते कोणाच्याही हाती दिले नाही. त्याचा विश्वास जिंकला होता. बाबांच्या शब्दांचा विजय झाला होता. बाबांना जिवंत पाहून सर्व भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

त्यानंतर जवळपास 32 वर्ष साई नीं या शिर्डीच्या भूमीवर आपले कार्य केले.
आजही भाविक प्रथम श्री खंडोबा च्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. व नंतर श्री साईबाबा च्या दर्शनाला जातात जसे प्रथम बाबा खंडोबाच्या दर्शनाला आले होते, तसेच भाविकही सर्वप्रथम खंडोबाच्या मंदिरात येतात.


म्हाळसापती फार वयोवृद्ध झाले होते. दृष्टीचें तेज ही मंद झाले होते वृद्धावस्थेमुळे ते चालू शकत नव्हते. पण मुलगा मार्तंडरावा च्या पाठीवर बसून मशीदीत दिवसातून एकदा तरी ते बाबांना भेटायला नक्की येत असत.
श्री साईबाबा व श्री म्हाळसापती या दोघांमधील प्रेम सदैव जिवंत होते. ते दोघे ही पुराणकथा व
इतर धार्मिक विषयांवर त्यांना चर्चा करायला नेहमीच आवडत होते.

आणि त्यामुळे बाबा त्यांचे ऐकायचे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्री म्हाळसापती ही अशी एकमेव व्यक्ती होती जी बाबांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावत असत. बाकीचे भक्त ते फक्त मानेवर किंवा छातीवर लावू शकत होते. याचमुळे म्हाळसापती हे एकमेव श्रेष्ठ भक्त होते.

श्री साईबाबांच्या आगमनापासून ते त्यांच्या समाधी पर्यंत संपूर्ण साई बाबांचा सहवास त्यांना लाभला अविरत बाबा आणि खंडोबाची सेवा करून भक्तांच्या मनावर उंच स्थान प्राप्त केले.आजही श्री म्हाळसापती हे नाव बाबांशी जोडले जाते. मरण्यापूर्वी त्यांना “मल्हारी महात्म्य” एकायचे होते ते ऐकताच त्यांनी प्राणाची आहुती दिली. ,


त्यांचे पुत्र मार्तडराव यांनी मंदिरातील पूजा अर्चा करण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली.अशा महान श्री साई परमभक्त म्हाळसापती यांचे मंगळवार १२ सप्टेंबर १९२२ रोजी निधन झाले. अविरत बाबा आणि खंडोबाची सेवा करून भक्तांच्या मनावर उंच स्थान प्राप्त केले

.आज त्यांची 102 वी पुण्यतिथी निमित्ताने हा लेख
शब्दांकन श्री म्हाळसापती यांचे पंतू
संदिप मनोहर नागरे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button