Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगरक्राईम

संगमनेर येथील नूतन जोडप्याचे पुणे येथे गळफास लावून आत्महत्या

जोडप्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. ११) घडली. वैभव आमले आणि स्नेहा आमले अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. मन हेलावून टाकणारी ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर येथे घडली आहे. त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

sai nirman
जाहिरात

मृत वैभव आमले आणि स्नेहा आमले हे संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रहिवासी होते. अगदी तीन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही पुणे शहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. काही दिवसांपूर्वी दोघेही अचानक गावी निघून आले. रविवारी ( दि ११) रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांनी मुळा नदीच्या मागमळीत झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

मृतदेह एका गावकऱ्याला झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. त्याने त्वरित पोलिसांना सूचित केले. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button