Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
राजकीयशिर्डी

 नामदार विखेंच्या मतदार संघात असलेल्या शिर्डी नगर परिषदेने मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली  

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी तसेच दाखल्यांसाठी नवा पैसा लागणार नसल्याच विधीमंडळाच्या अधिवेशनात मंत्री शंभूराजे देसाई यांनी जाहीर केलय मात्र राज्याच्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंच्या मतदार संघातील शिर्डी नगरपरिषदेत रहिवाशी दाखल्यासाठी चक्क पन्नास रुपये आकारले जात असल्याच दिसून येतय..

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


 पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा घोषणा केली.. त्यानंतर कागपत्रांची जुळवाजुळव करताना सरकरारी कार्यालयात महिलांची अक्षरशः गर्दी झाली.. यातच काही ठिकाणी पैसे घेत असल्याचे आरोप होत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी यात कोणीही पैसे घेवू नये अन्यथा कारवाई केली जाईल अस स्पष्ट जाहीर केल..


मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आज विधीमंडळाचा अधिवेशनात कॅबीनेटमंत्री शंभूराजे देसाई यांनी बोलताना लाडकी बहीण योजनेसाठी तसेच यासाठी लागणा-या दाखल्यांसाठी एक पैसा ही घेतला जात नसल्याच स्पष्ट केल..
शंभूराजे देसाई यांनी जरी पैसे घेत नसल्याच सांगीतल असल तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंच्या  अधिपत्या खाली असलेल्या शिर्डी नगर परिषदेत रहीवाशी दाखल्यासाठी चक्क पन्नास रुपये आकारले जाताय.. एकीकडे सरकार एक रुपया लागणार नसल्याच सांगतय तर त्याच सरकारी यंत्रणेत कागदपत्र आणि दाखल्यांसाठी पैसे घेतले जात असल्यान महिलांनी नाराजी व्यक्त केलीये..


लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी सरकारने काही अटी शिथिल केल्या आहेत मात्र पुरेशी माहीती उपलब्ध नसल्यान महिलांची वणवण होताना दिसतेय.. तर नगरपरिषद पैसे कसे आकारतय याचे उत्तर देण्यासाठी मुख्याधिकारीच उपलब्ध नसल्याच दिसून आले आहे..

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button