Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

शिक्षकांनी शासनाच्या परिपत्रकाच्या पलीकडे जाऊन गोरगरीब मुलांना ज्ञानदान करावेप्रा गणेश शिंदे

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी येथील साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटीच्या वतीने शालेय बक्षिस वितरण समारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे प्रशासकीय अधिकारी बी डी दाभाडे प्रज्ञा महाडुळे. विश्वनाथ बजाज चेअरमन विठ्ठलराव पवार व्हाइस चेअरमन पोपटराव कोते आदिच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रंसगी प्रा गणेश शिंदे म्हणाले की शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल होत असून जगभरातील विद्यापीठे भारतात येत असून भारताने गॅट करार स्वीकारला असल्याने शिक्षणाला आता सीमा उरली नाही केवळ गुणपत्रिकेला सूज आली आहे त्या पलीकडे पालक व विद्यार्थ्यांनी बघितले पाहिजे मोठे बदल होताना आपण बदलले पाहिजे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

केवळ नोकरीसाठी शिक्षण हा विचार सोडला पाहिजे शिक्षकांनी शासनाच्या परिपत्रकाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञान व मार्गदर्शन देण्याची गरज असून शिक्षकांच्या हातात एक पिढी असून शिक्षकांनी निवृत्त झाल्यानंतर जर कोणी विचारले तर इतकी ग्रॅज्युटी मिळाली इतका फंड मिळाला मुलांची लग्न केली बंगला बांधला चार चाकी घेतली हे न सांगता जर मी घडवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दहा विद्यार्थी उच्च पदावर काम करत आहे हे जर सांगितले तर खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालो असे परखड मत प्राध्यापक गणेश शिंदे यांनी शिर्डी येथे बोलताना व्यक्त केली


पालकांनी विद्यार्थ्यांचा कल ओळखुन मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज असून त्यांना मार्कात गुंतवू नका असे सांगताना साईसंस्थान दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान आहे भक्त कसा थांबेल या दृष्टिकोनातून देखील बरेच काही करता येणार आहे त्या दृष्टीने देखील विद्यार्थ्यांनी बघितले पाहिजे या ठिकाणी टुरिझम व पर्यटन व्यवसायाला मोठे संधी आहे

या ठिकाणी वॉटरपार्क थीमपार्क अगत्य कृषी पर्यटन मोठी हॉटेल इंडस्ट्रीज उभी राहिली आहे त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी आपल्या भाषणात सोसायटीच्या माध्यमातून यापुढील काळात सभासद कामगार व त्यांच्या मुला मुलींसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी सर्व संचालक सभासद सेवक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button