Letest News
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड
क्राईमशिर्डी

शिर्डीतील धुमस्टाईल चोरी करणारे चोरटे जेरबंद

शिर्डी प्रतिनिधी/शिर्डी शहरात वाढत्या धुमस्टाईल चोरीच्या घटना व गुन्हे रोखण्यासाठी विशेष पथकाची देखील स्थापना करण्यात आली होती या चोरीच्या घटनेत विना नंबरच्या पल्सरचा वापर होत असे मात्र पहिल्यांदा २८ मे रोजी पिंपळवाडी रोडवर असलेल्या दत्तनगर येथे बुलेट वरील अनोळखी तरुणांनी दुकानात बसलेल्या संगीता सुरेश बाबू रामलिंगम या महिलेच्या गळ्यातून साडेतीन तोळे वजनाची मंगळसूत्र ओढून नेले होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

त्याबाबतचा गुन्हा देखील शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर ३० मे रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे या पथकातील कर्मचारी सतपाल शिंदे व केवल राजपूत यांनी साकुरी शिवाजवळ सीताफिने पाठलाग करून बुलेटवरील दोन संशयित तरुणांना जेरबंद करुन ताब्यात घेतले होते त्यातील हे दोन तरुण छत्रपती संभाजी नगर येथील असल्याचे समजते

kamlakar


अधिक माहिती अशी की बुलेट वरील शुभम मधुकर आधोडे रामनगर गल्ली क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर वय २५ व त्याचा मित्र राहुल कमलादास बर्डे व २४ राहणार सिंधखेड चिंचोली तालुका घनसांगवी जिल्हा जालना येथील असल्याचे निष्पन्न झाले होते पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी २८ मे रोजी शिर्डीतील महिलेचे साडेतीन तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली

त्यांच्याकडून मंगळसूत्राची बनवलेली ३० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व नवी कोरी बुलेट असा तीन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून त्यांच्यावर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहे रात्रीचा प्रवास करून थेट बुलेट वरून ते शिर्डी. येथे येत ह्या दोघांची अतिशय बारकाईने चौकशी सुरू असून

या अगोदर शिर्डी येथे किती गुन्हे केले आहे त्यांच्यावर या अगोदर गुन्हे दाखल आहेत का तसेच यातून मिळालेले पैसे कोठे खर्च करत होते यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा देखील अधिक तपास उपविभागीय अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी हे करत असून या कारवाईत धूमस्टाईल चैन स्केचिंग पथकातील कर्मचारी इरफान शेख अशोक शिंदे बाबा खेडकर गजानन गायकवाड योगेश गरदास यांनी भाग घेतला होता २८ मे रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शिर्डी पोलिसांनी व्यक्त केली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button