Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
क्राईम

नगर जिल्ह्याच्या स्थानिक आंवेशन विभागातील पोलिसांची कोपरगाव गुटखावर मोठी कारवाई परंतु कोपरागावाच्या् गुटखा तस्करावर मेहेरनजर का नागरिकांचा सवाल

कोपरगाव-(प्रतिनिधी)
अवैध गुटखा प्रकरणी गुन्हा,१६ लाखांचा ऐवज जप्त,गुन्हा दाखल
कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा येथे काल दुपारी ०३ वाजेच्या सुमारास अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईत १० पोत्यापेक्षा जास्त गुटखा,विविध पुडे,महिंद्रा पिकअप (क्रं.एम.पी.४६ जी.२३५७) हि रंगेहात पकडली असून त्यातील माल पोलिसानी जप्त केला असून यातील पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील दोन आरोपी जेरबंद केले असून कोपरगाव येथील आरोपीसह तीन फरार झालं असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यातील गुटक्यातील बेबंदशाही उघड झाली असून कोपरगाव पोलिसांना अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर आणि तालुक्यात अलीकडील काळात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असल्याचे वारंवार आढळून येत आहे.त्यामुळे नगर स्थानिक गुन्हे शाखेची या शहर आणि परिसरात वक्रदृष्टी झाली असून पूर्वी या शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त खबरीनुसार कोपरगाव तालुका हद्दीत सुरेगाव हद्दीत दि.०८ मे २०२३ रोजी केलेल्या कारवाईत तीन आरोपी व गुटख्याच्या दोन गाड्या जप्त केल्या होत्या.यातील ६.११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.त्या घटनेस अकरा महिने उलटत आले असताना पुन्हा एकदा अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या गुटक्याला पायबंद घालण्यास सुरुवात केली असून कोपरगाव पोलिसांच्या डोळ्यात अंजन घातले असल्याचे मानले जात आहे.याबाबत त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी पाळत ठेवून केलेल्या कारवाईत नगर-मनमाड व कोपरगाव-संगमनेर रोडवरील चौफुलीवरुन सदर महिंद्रा पिकअप दुपारी ०३ च्या सुमारास जाणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांनी साध्या वेशातील आपली माणसे पेरून ठेवली होती.त्या मार्गावर गाडी आल्यावर त्यांनी तिला थांबवले असता त्यांना मिळालेल्या माहितीची त्यांनी खात्री केली असता ती माहिती खरी निघाली होती.

kamlakar

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेली कारवाईत त्यांना ०४ लाख ३५ हजार ६०० रुपयांचे १० पोते त्यात पिवळ्या रंगाच्या १० गोण्या व प्रत्येक गोणीवर विमल पान मसाला असे नाव असलेली प्रत्येकी दहा पुडे त्यावर प्रत्येक पुडीवर किंमत रुपये १९८ रुपये,४८ हजार रुपये किमतीच्या तंबाकु नाव असलेल्या १० गोण्या पुड्या,०४ लाख ११ हजार ८४० रुपयांच्या दहा सिल्व्हर रंगाच्या मोठ्या गोण्या,त्यात चार लहान गोण्या,त्यात राज निवास सुगंधित पान मसाला,त्या शिवाय ०१ लाख ०५ हजार ६०० रुपयांच्या २ फिक्कट गुलाबी गोण्या,या शिवाय ०६ लाख रुपये किमतीची एक महिंद्रा कंपनीची वरील क्रमांकाची पांढऱ्या रंगाची गाडी असा एकूण १६ लाख ०१ हजार ४४० रुपयांचा अवैज जप्त केला आहे.

दरम्यान यातील आरोपी राजू उत्तम भिल (वय-३२)रा.गवाडी,ता.निवाली जि.बडवानी मध्य प्रदेश,मितेश राजू भाबड,(वय-२८)रा.अंबिकापुरी इंदोर मध्यप्रदेश,अभय गुप्ता रा.छोटा बंगरदा रोड,इंदोर,मध्यप्रदेश,आदींना पोलिसानी अटक केली असून यातील योगेश कटाळे,रा.कोपरगाव व किरण लामखडे रा.घारगाव, ता.संगमनेर हे दोघे मात्र फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.यातील कोपरगाव येथील आरोपी हा वारंवार या गुन्ह्यात निष्पन्न होत असल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांपुढे त्यावरील कारवाईचे आव्हान निर्माण झाले आहे.ते या आरोपीवर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान या घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप निरीक्षक यांचेसह सहाय्यक पो.नीं.मयूर भामरे यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना.संतोष खैरे यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या दप्तरी अनुक्रमे गुन्हा क्रं.२०४ /२०२४ भा.द.वि कलम ३२८,१८८,२७२,२७३,३४ अन्वये नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भामरे करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button