Letest News
पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्... मागील भांडणाच्या कारणावरून एका कुविख्यात गुंड्याने केले गोळीबार श्रीरामपूर शहर हादरले  थायलंड येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये शिर्डी चा निलेश वाडेकर याने मिळवले ब्रांझ मेडल कोट्यावधिचे मुद्देमाल जप्त करत नगर गुन्हे अन्वेषण पथकाने केली कामगीरी भारी !! शरद पवारास जिल्हाधिकारी साहेबांचा चांगलाच हिसका ! शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर देह व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी केले चार हॉटेल सील हॉटेल् सील झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ गणेशोत्सवात ‘बाप्पाच्या गप्पा’ उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती
Blog

शिर्डी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून गरिबावर  कारवाईव काहीना अभय अन्यायकारक बाब  जनतेत नाराजी

शिर्डी प्रतिनिधी/  नगर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका  नगर परिषद  आपल्या गावातील अतिक्रमण काढण्यासाठी नोटीसा देऊन सिमाकण करून कारवाईच्या हालचाली करत असताना  शिर्डी नगरपरिषद मात्र हातावर पोट भरत असलेल्या लोकांवर कारवाई करुन माल जप्त करण्यासाठी आपल्या वाहनांची मदत घेऊन सगळे पथक काम करत असताना इतर नगर मनमाड रोड  सह शहरातील सर्व रस्ते उपरस्ते पॅल्टफाॅम आतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असताना शिर्डी नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग  शेती महामंडळ या संबधित आधिकारी  का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल  जागरूक नागरिकांनी  थेट जिल्हाधिकारी सिध्दाराम साली मठ यांना लेखी निवेदन देऊन विचारला असुन मोठ्या आतिक्रमणाच्या प्रश्नाकडे का दुर्लक्ष केले जात असुन फक्त हातावर पोट भरणारे जे लोक आहेत त्याना वेठीस धरले जात आहे हा मोठा अन्याय आहे असे निवेदनात म्हटले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


  शिर्डी शहराची लोकसंख्या कमी असली तरी मोठ्या प्रमाणावर साईभक्त भाविकांची वर्दळ असते शहरात जागेला लाखो रुपयांचे मोल आले आहे त्यामुळे अनेकांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी दुकानासमोरच पोट भाडेकरू टाकून आर्थिक उत्पन्न सुरू केले आहे याची खडानखडा बारीक सारीक  माहिती अतिक्रमण विभागात जास्त वर्षापासून जे कर्मचारी व प्रमुख  यांना आहे मात्र ताकदवान लोकांची नको नाराजी हि भुमिका गोरगरिबांवर कारवाई साठी कारण ठरु पहात आहे गरिबांचा  नसलेला वशिला  नसलेले राजकीय पाठबळ यामुळे कारवाईच्या वेळी सैरावैरा पळणारी  मानस महिला  हजारो रुपये भाडे घेऊन कारवाईच्या वेळी हात झटकणारा  मालक हे भिषण वास्तव् साईच्या दरबारात सुरू असलेला खेळ अनेकांची झोप उडवणारी व कर्जाच्या खाईत लोटणारी  असताना हा विभाग काहीना  एक न्याय व काहीना दुसऱ्या पध्दतीने अभय देत आहे या विभागात अनेक वर्षांपासून काहीजण ठाण माडुन बसले आहे या विभागात काम करणारे तोंड पाहुन काम करत आहे हे देखील सत्य आहे वाढलेला जनसंपर्क आर्थिक हितसंबंध व जो तक्रार करेल त्याचे नाव गाव सुध्दा सागितले जाते गोपनीयता नसल्याने लोक नको झंझट अशी भुमिका घेतात तसा अनुभवच काहीनी घेतला आहे  माजी व भावी नगरसेवकांची नको नाराजी हि भुमिका गरिबांसाठी त्रासदायक ठरते आहे

kamlakar

 अनेकदा गरिबाचे साहित्य हात गाडे टेबल फर्निचर पलंग खुर्ची टोपल्या सायकली  लोखंडी टेबल व विविध माल जप्त केला जातो व नष्ट देखील केला जातो अशा वेळी गरिबांच्या डोळ्यात अश्रू येताना दिसतात मात्र नको वाद म्हणून परत हात उसणे व्याजाने सावकाराकडून पैसे घेऊन पोटासाठी संघर्ष करणारा वर्ग एकीकडे तर पोट भाडेकरू दुकानासमोर ठेवून हजारो रुपये रोज कमावणारे दुसरीकडे हे देखील धक्कादायक आहे या गंभीर प्रश्नात लोकप्रतिनिधी ना राधाकृष्ण विखे व खा सूजय विखे यांनी देखील लक्ष घालण्याची गरज आहे आपल्या यंत्रनेकडुन माहिती घेतली पाहिजे  या गंभीर प्रश्नात माजी खासदार भाऊसाहेब  वाकचौरे  यांनी देखील सत्तेवरून पाय उतार झाल्यावर २० वर्षापासून  मौनाची असणारी भुमिका देखील ज्या लोकांना त्रास होत आहे त्या कुटुंबांना लक्षात ठेवल्या असुन योग्यवेळी मतपेटीतुन आपली ताकद दाखवणार असल्याचा सुर दबक्या आवाजात सुरू आहे एकीकडे कमी होणारी गर्दी व राजकीय साठमारीत हातावर पोट भरत असलेल्या लोकावरची कारवाई  बघता नगर परिषदेने ठोस भूमिका घेण्यासाठी तात्काळ कारवाई करुन शहरातील रस्ते मोकळे होतील लोकांना मोकळे फिरताना श्वास कसा घेता येईल  हे येणारा काळच ठरवणार आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button