Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
Blog

शिर्डीत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून साध्या वेशात पोलिसांची गस्त!साई भक्तांच्या गाड्या अडवून पॉलिसी करणाऱ्या अनेक पॉलिसी एजंटवर या पथकाची कारवाई!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना किंवा साई भक्तांच्या वाहनांना रस्त्यात अडवून साई मंदिर परिसरात व शहरातील विविध ठिकाणी पॉलिसी एजंट हे साई भक्तांना हार प्रसाद घेण्यास व मंदिरात साईदर्शन करून देतो असे खोटे सांगून पुढे जाण्यास प्रतिबंध करीत असल्यामुळे साई भक्तांना त्याचा मोठा त्रास होतो व आर्थिक फटका बसतो. हे ध्यानात घेऊन व साई भक्तांच्या मागणीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शिर्डी येथे या प्रकाराचा व पॉलिसी एजंटचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष असे पोलीस पथक नेमून हे पथक येथे शिर्डी पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस मुख्यालयातील पथक हे संयुक्तरित्या काम करत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

हे पथक साध्या वेशात साई मंदिर परिसर व शहरातील ठिकाणी गस्त घालत असताना या पोलीस पथकाला पॉलिसी एजंट करणारे व साई भक्तांच्या गाड्या आढळणारे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. हे पथक गेल्या काही दिवसापासून काम करत असून या पथकाने साई मंदिर परिसर व शहरातील ठीक ठिकाणी साई भक्तांना व साई भक्तांच्या गाड्या अडवून हारप्रसाद व साईबाबांचे दर्शन करून देत असे खोटे सांगून साई भक्तांना एक प्रकारे फसवण्याचा व पुढे जाण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केल्यावरून विशाल शिरसाठ,शिर्डी .

kamlakar

शिवाजी राजू थोरात पुणतांबा ,राहुल प्रकाश गोरुडे कोल्हार ,संतोष प्रल्हाद साळवे शिंगवे ,किरण गोपीनाथ गांगुर्डे राहता ,सुभाष आदेश गायकवाड शिर्डी, बाबू गबाजी शिर्के राजगुरुनगर, सिद्धार्थ अशोक पठारे सावळी विहीर, शिवशंकर कन्हैयालाल निशाद ,शिर्डी .जालिंदर सुभाष हातागळे शिर्डी ,गणेश रामनाथ कचरे शिर्डी ,अजय प्रताप चव्हाण शिर्डी ,सागर हरिभाऊ पगारे शिंगवे, सचिन नंदू पगार शिंगवे, अर्जुन अशोक वायकर शिर्डी, भाऊसाहेब पापा थोरात पुणतांबा, या पॉलिसी एजंटला साई भक्तांच्या गाड्या अडवताना व हार प्रसाद घेण्यास व मंदिरात दर्शन करून देतो असे म्हणताना रंगेहाथ पकडले असून या सर्वांवर शिर्डी पोलीस स्टेशनला भादवि कलम 341 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पोलीस पथकामुळे शिर्डीत पॉलिसी एजंट वर मोठी जबराक बसली आहे. यापुढेही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये शिर्डी पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस कॉन्स्टेबल शेख, पोलीस कॉन्स्टेबल राठोड पोलीस कॉन्स्टेबल योगेश थोरात आदींसह शिर्डीत हे पोलीस पथक असेच कार्यरत राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके ,पोलीस निरीक्षक सोपानराव गायकवाड यांनी सांगितले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button