Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
अ.नगरराजकीय

सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव!

पारनेर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत पारनेरच्या राजकारणात पुन्हा एकदा खासदार निलेश लंके यांनी आपली ताकद दाखवून देत विजयाची बाजी मारली आहे. भाजपचे राहुल शिंदे यांचा पराभव करत लंकेंनी ६४ मते मिळविली, तर शिंदे यांना ४० मतांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे पारनेरच्या राजकारणात लंकेंचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले असून, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या विजयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या निवडणुकीत निलेश लंके यांना पराभूत करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावल्याचे चित्र होते. राजकीय समीकरणांची जुळवाजुळव, नेत्यांच्या भेटीगाठी, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न आणि विजयासाठी आखण्यात आलेल्या रणनीतीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र, निकालाच्या आकडेवारीने लंके समर्थकांच्या बाजूने कौल दिला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


६४ विरुद्ध ४०! या मतांच्या फरकाने लंकेंनी प्रतिस्पर्ध्यावर आघाडी घेतली. विरोधकांनी कितीही ताकद लावली, तरी मतदारांचा कौल आपल्या बाजूने वळविण्यात लंके यशस्वी ठरल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, पारनेरमधील राजकीय प्रभावाची चाचणी म्हणूनही पाहिला जात आहे.
जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेची कसोटी लागलेल्या या लढतीत लंकेंनी बाजी मारल्याने विरोधकांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राहुल शिंदे यांचा पराभव भाजपसाठी धक्का मानला जात असताना, लंकेंच्या विजयाने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


एकूणच, जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची ताकद विरुद्ध निलेश लंके यांचा राजकीय प्रभाव, अशा रंगलेल्या या लढतीत अखेर लंकेंनी विजयाचा झेंडा फडकावला! पारनेरच्या राजकारणात या निकालाचे पडसाद आगामी राजकीय घडामोडींमध्ये कसे उमटतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button