Letest News
पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा...
खेळशिर्डी

प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी!

कोपरगाव | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रज्ञाशक्तीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२६-२७’ च्या प्रचार व प्रसारासाठी तीन जिल्ह्यांमध्ये प्रतिनिधींची भरती सुरू करण्यात आली आहे. अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील विविध तालुक्यांमध्ये काम करण्यासाठी उत्साही, मेहनती आणि जबाबदार तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या प्रतिनिधींना शाळा व शैक्षणिक संस्थांना प्रत्यक्ष भेटी देणे, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संपर्क साधणे, परीक्षेची माहिती पोहोचविणे तसेच परीक्षा पुस्तके, अर्ज व नोंदणी प्रक्रियेचा प्रचार करणे आदी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सहा प्रतिनिधींची नियुक्ती
प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा कार्यालयामार्फत एकूण सहा प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव, पाथर्डी; नगर व पारनेर; कर्जत, श्रीगोंदा व जामखेड या तालुक्यांचा समावेश आहे. तसेच नाशिक, दिंडोरी, निफाड आणि गंगापूर, पैठण, खुलताबाद या तालुका समूहांसह छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड व फुलंब्री या भागांतही प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत.
नियुक्त प्रतिनिधींना संबंधित कार्यक्षेत्रातील शाळांची माहिती व संपर्क क्रमांक संकलित करणे, नियमित शाळाभेटी घेणे आणि दैनंदिन कामाचा अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.


पदवीधर तरुणांना प्राधान्य
या भरतीसाठी उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक असून उच्चशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराकडे स्वतःची दुचाकी आणि वैध वाहनचालक परवाना असणे बंधनकारक आहे. नियमित प्रवास करण्याची तयारी, प्रभावी संवादकौशल्य, नियोजनक्षमता आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या तरुणांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.


आकर्षक मानधनासह पेट्रोल खर्चाची सुविधा
निवड झालेल्या प्रतिनिधींना आकर्षक मानधनासोबत कामगिरीनुसार प्रोत्साहन दिले जाणार आहे. कामाच्या आवश्यकतेनुसार नियोजन करून पेट्रोल खर्चाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवाराच्या नियुक्तीनुसार जवळचे व आसपासचे तालुके कार्यक्षेत्र म्हणून निश्चित केले जातील.
शैक्षणिक क्षेत्रात संपर्क वाढवू इच्छिणाऱ्या आणि स्वतःच्या कौशल्याला व्यावसायिक संधीची जोड देऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी या भरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


संपर्कासाठी आजच पुढाकार घ्या!
प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा कार्यालय
पत्ता : श्रीगणेश, रिद्धी-सिद्धी नक्षत्र, इरिगेशन कॉलनीच्या मागे, कोपरगाव – ४२३६०१.
संपर्क क्रमांक :
९२७०३७९७६५
९२२६४१६०५५
वेबसाइट : www.prarambheducation.in
भरती सुरू आहे! इच्छुक पदवीधर तरुणांनी आजच संपर्क साधावा.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button