Letest News
रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे...
राजकीयशिर्डी

३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव!

शिर्डी | प्रतिनिधी
आई-बाबांच्या शिर्डीत गणेशोत्सवाला भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीची जोड देत क्रांती युवक मंडळाने गेल्या ३४ वर्षांपासून आपली अनोखी परंपरा जपली आहे. विशेष म्हणजे, या प्रदीर्घ प्रवासात मंडळाने आजपर्यंत एकदाही डीजे, डॉल्बी अथवा कर्कश आवाजाच्या वाद्यांचा आधार घेतलेला नाही. पारंपरिक वाद्ये, भजन, ढोलपथक आणि भक्तिमय वातावरणातून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे.
क्रांती युवक मंडळ हे शिर्डीतील निर्व्यसनी आणि पारंपरिक गणेशोत्सवासाठी ओळखले जाणारे मंडळ म्हणून परिसरात विशेष परिचित आहे. मंडळाचा नियमच असा आहे की, मंडळाशी जोडलेल्या कार्यकर्त्याने कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. त्यामुळे गेल्या ३४ वर्षांपासून तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवत संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचे काम मंडळाच्या माध्यमातून केले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पालखीतून गणरायाची मिरवणूक काढणारे पहिले मंडळ
शिर्डीत गणरायाला पालखीत विराजमान करून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याची सुरुवात करणाऱ्या मंडळांमध्ये क्रांती युवक मंडळाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. गणेशाची स्थापना असो अथवा विसर्जनाची मिरवणूक—प्रत्येक कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीला प्राधान्य दिले जाते.
मंडळाचे स्वतःचे ढोलपथक असून कार्यकर्ते कोणत्याही बाहेरील डीजेवर अवलंबून न राहता स्वतः ढोल वाजवत गणरायाची सेवा करतात. संबळ वादन, भजन आणि तालाच्या ठेक्यावर निघणारी मिरवणूक हे मंडळाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर मराठमोळा फेटा आणि हातात पारंपरिक वाद्ये, असा उत्साहपूर्ण माहोल यावेळी पाहायला मिळतो.


पाच-सहा वर्षांच्या बालवयात सुरू झालेला प्रवास
विशेष म्हणजे, आज ३४ वर्षांची परंपरा निर्माण करणाऱ्या या मंडळाची सुरुवात करणारे अनेक कार्यकर्ते त्यावेळी अवघ्या पाच-सहा वर्षांचे होते. बालवयात सुरू झालेली ही गणेशभक्ती आजही त्याच कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने आणि नव्या पिढीच्या सहभागातून अखंड सुरू आहे.
“आपल्या घरातील गणेशोत्सव ज्या पद्धतीने आपण भक्तिभावाने साजरा करतो, त्याच भावनेने मंडळातही काम करतो. मंडळासाठी स्वतः श्रम करण्यामध्ये वेगळाच आनंद आणि समाधान मिळते,” अशी भावना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


‘व्यसनमुक्त तरुणाई’ हाच मंडळाचा संकल्प
गणेशोत्सव म्हणजे केवळ जल्लोष नव्हे, तर संस्कार आणि सामाजिक संदेश देण्याचे माध्यम असावे, या भूमिकेतून क्रांती युवक मंडळाचा प्रवास सुरू आहे. व्यसनमुक्त तरुणाई, पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि भक्तिमय वातावरण या त्रिसूत्रीवर मंडळाची वाटचाल सुरू आहे.
३४ वर्षे डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून दूर राहून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाची परंपरा निश्चितच शिर्डीतील अन्य गणेश मंडळांसाठीही अनुकरणीय ठरत आहे.

सचिन तांबे यांनी उभी केलेली ही परंपरा केवळ ३४ वर्षांचा उत्सवाचा प्रवास नसून, अनेक तरुणांच्या आयुष्याला संस्कारांची दिशा देणारी चळवळ ठरली आहे. त्यामुळे क्रांती युवक मंडळाच्या या संस्कारमय आणि भक्तिमय वाटचालीचे शिल्पकार म्हणून सचिन तांबे यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button