Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्ण जन्मसोहळ्याचा आनंद घेतला.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने रात्री १० ते १२ या वेळेत ह.भ.प. श्री. राजेंद्र पांडुरंग मांडेवाल, सानपाडा, नवी मुंबई यांचे ‘श्रीकृष्ण जन्म’ कीर्तन झाले. कीर्तनातून श्रीकृष्ण जन्माची कथा, त्यांचे बालचरित्र तसेच भक्ती आणि धर्माचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. कीर्तनाच्या माध्यमातून समाधी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा मंगल क्षण साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित साईभक्तांनी जयघोष करत जन्मोत्सवाचा आनंद लुटला. ‘गोविंदा-गोविंदा’, ‘जय श्रीकृष्ण’ आणि ‘साईबाबा की जय’ अशा जयघोषाने समाधी मंदिर परिसर दुमदुमून गेला.
यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, पुजारी, संस्थानचे अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.
श्रीकृष्ण जन्मोत्सवानंतर श्रींची शेजारती संपन्न झाली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या उत्सवामुळे साईनगरीत आध्यात्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button