Letest News
श्री साईबाबांच्या चरणी ११ लाख १९ हजार रुपयांचे हिरेजडित सोन्याचे ब्रोच अर्पण ‘टक्केवारी कुणी मागितली?’ ते ‘ट्रम्पमुळे डांबर मिळत नाही!’ नगर–मनमाड रस्त्यावर राजकारण तापले श्रीरामपुरात जेधे–बेग टोळीवर कायद्याचा दणका!खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात बीएनएस कलम १११चा वापर बंटी लहामगे फरार- पण गुटखा तस्करी जोमात ‘त्या’ नेटवर्कला कोणाचा वरदहस्त? गुन्हा दाखल असताना आरोपी रा... श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६; काशी-अयोध्येसह पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर...
राजकीयशिर्डी

श्री साईबाबांच्या चरणी ११ लाख १९ हजार रुपयांचे हिरेजडित सोन्याचे ब्रोच अर्पण

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा असून, श्रद्धेपोटी भाविक साईचरणी भरभरून दान अर्पण करत असतात. अशाच भक्तिभावाचे दर्शन नवी दिल्ली येथील साईभक्त श्री. सतीश कुमार चान्ना यांनी घडविले आहे.
श्री. चान्ना यांनी ७५ ग्रॅम वजनाचे, आकर्षक नक्षीकाम केलेले आणि हिऱ्यांनी जडविलेले सोन्याचे ब्रोच श्री साईबाबांच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केले. या मौल्यवान ब्रोचची किंमत ११ लाख १९ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
साईभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेली ही अनमोल भेट श्री साईबाबांप्रती असलेल्या त्यांच्या नितांत श्रद्धेचे प्रतीक ठरली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

श्री साईबाबांच्या चरणी देश-विदेशातील भाविकांकडून विविध स्वरूपात दान अर्पण केले जात असून, भाविकांच्या श्रद्धेचा हा अखंड प्रवाह आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे.
दरम्यान, या उदार देणगीबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त श्री. सतीश कुमार चान्ना यांचा सत्कार करून त्यांच्या भक्तिभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
“सबका मालिक एक” या साईबाबांच्या शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून साईचरणी अर्पण करण्यात आलेली ही मौल्यवान भेट भाविकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button