Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर संशय!

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील गुटखा तस्करी प्रकरणात अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिकाऱ्यांनी संशयास्पद मौन बाळगत कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा आरोप करत राज्याचे एफडीए आयुक्त, अन्न व औषध प्रशासन मंत्री, लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांच्याकडे ई-मेलद्वारे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तक्रारीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, गुटखा तस्करीसारख्या गंभीर आणि जनहिताशी संबंधित प्रकरणात अपेक्षित कारवाई न करता संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे नेमके कोणाला वाचविण्याचा प्रयत्न झाला? कारवाई का रोखली गेली? यामागे कोणाचे राजकीय किंवा आर्थिक हितसंबंध आहेत का? अशा अनेक प्रश्नांनी आता डोके वर काढले आहे.
तक्रारदाराने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीपुरती मर्यादित न राहता कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आता या तक्रारीनंतर राज्यातील सर्वोच्च यंत्रणा कोणती भूमिका घेणार, दोषींवर खरोखर कारवाई होणार की हे प्रकरणही कागदावरच दडपले जाणार, याकडे शिर्डीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


:
जनतेचे सवाल…
गुटखा प्रकरणात वेळेवर कारवाई का झाली नाही?
संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली का?
कोणाला वाचविण्यासाठी कारवाई टाळली गेली?
दोषींवर गुन्हे दाखल होणार की फक्त चौकशीचा देखावा होणार?

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button