9 नाण्यांचा मांडलाय बाजार हे खरे का खोटे! मात्र आता ग्रामस्थामुळे होणार नऊ नांण्यावाल्यांचे तोटे!!
श्री साईबाबांच्या समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना श्री साईबाबांनी ९ नाणी दिली आहेत. सदरचे ९ नाणी हि आमच्याकडे असल्याचे खोटी माहिती शिर्डीतील गायकवाड व शिंदे कुटुंबिय सांगून ती खोटी नाणी देश विदेशात फिरवली जात आहे व त्यातून मोठ्या प्रमाणात साईभक्तांची आर्थिक फसवणूक करत आहेत. सध्या सदरचे ९ नाण्यांचे २२ नाणे तयार झाले असुन यातील खरे नाणे व खोटे नाणे तपासून ती संस्थानकडे जमा करावीत साईभक्तांना बघण्याकामी म्युझियम मध्ये ठेवावी. तसेच खोटी माहिती पसरुन साईभक्तांची आर्थिक लूट करुन धार्मिक भावना दुखाविणा-या संबंधित गायकवाड व शिंदे कुटुंबियांवर कारवाई करणेबाबत शिर्डी ग्रामस्थांनी संस्थानकडे तक्रार दिलेली होती.
सदर तक्रारीचे अनुषंगाने शिर्डी येथील शिंदे व गायकवाड कुटुंबियांना आपलेकडे असलेल्या या नाण्यांचे सत्यतेबाबत खात्री पटविण्यासाठी आपण सदर ९ नाणे श्री साईबाबा संस्थानकडे जमा करावे. सदर नाण्याचे सत्यतेबाबत खात्री पटल्यानंतर नाणे आपणास परत देण्यात येईल, अथवा आपली इच्छा असल्यास सदरचे नाणे श्री साईबाबांचे वस्तुसंग्रहालामध्ये साईभक्तांचे दर्शनार्थ ठेवण्यात येईल, आपण आपणाकडे असलेले नाणे संस्थानकडे खात्री करण्यासाठी जमा न करता ते श्री साईबाबांनी आपणास दिले असल्याचे सांगून भक्तांची फसवणूक केल्यास कारवाई करण्यात येईल असे नमुद करण्यात आले होते. सदर पत्राचे अनुषंगाने शिंदे कुटुंबियांनी संस्थानचे पत्रास उत्तर दिले की आम्ही ९ नाणी बाहेर कोठेही घेऊन जात नाही व साईभक्तांची फसवणूक करत नाही. श्रीमती हिराबाई नाना पाटील शिंदे उर्फ शैलजाताई गायकवाड यांनी संस्थानचे या पत्राला कोणतेही उत्तर दिले नाही. संस्थानचे पत्रानंतरही श्रीमती हिराबाई नाना पाटील शिंदे उर्फ शैलजाताई गायकवाड व त्याचे चिरंजीव श्री अरुण गायकवाड दोघेही राहणार शिर्डी यांनी एन.टी.आर. ग्राऊंड, इंदिरा पार्क शेजारी, हैद्राबाद येथे ९ नाणे साईभक्तांचे दर्शनार्थ ठेवले असल्याचे व त्यामाध्यमातुन ऑनलाईन देणगी जमा करत असल्याचे व अशा प्रकारचे ९ नाणी दर्शनाचे अनेक कार्यक्रम त्यानी यापुर्वी केलेले असल्याचे उपलब्ध कागदपत्र व फोटोवरुन दिसून येत आहे.
श्री साईबाबांनी त्यांचे देहावसानसमयी लक्ष्मीबाई शिंदे यांना ९ नाणी दिली परंतू लक्ष्मीबाई शिंदे यांचे जे वारस आपल्याकडे श्री साईबाबांनी दिलेली ९ नाणी आहेत असे सांगतात त्या नाण्यांची संख्या २२ झालेली आहे. त्यामुळे जोपर्यंत श्री साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेल्या ९ नाण्यांची खात्री पटत नाही तोपर्यंत सर्व साईभक्तांना आवाहन करण्यात येत आहे की, साईभक्ताची फसवणूक टाळण्याचे दृष्टीने ९ नाण्यांचे दर्शनासंदर्भाने कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नये,