Letest News
संस्थानतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग क्लास व कोचिंग सुविधा उपलब्ध हॉटेलमधील मोबाईल चोरी व पितळी भांडे चोरीचे गुन्हे शिर्डी पोलीसांनी उघड केले चक्क ड्युटीवर असताना सर्वांसमक्ष,न भीता कोणास हा महाभाग गांजा ओढतो ! आसिफ शेख याने औरंगजेबची स्तुती केल्याने त्यावर व अबू आझमीवर गुन्हा दाखल करावा वंदे मातरम संघटना शिर्डीतील २ तरुणांकडे पोलिसांना धारधार शस्त्र सापडले दोघे अटकेत रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे यास जमीन मिळताच जल्लोष साजरा करणे पडले महागात राहाता आणी कोपरगांव मध्ये गर्भनिदान करणाऱ्यांचे फुटले पेव ! राजरोसपणे गर्भनिदान करी यांना राहिलेना क... संस्थानच्या साई आश्रम टू मध्ये सापडलेली दोन लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन असणारी पर्स संस्थान कर्म... पंढरपुरातील चंद्रभागेत नदीत बुडणाऱ्या 6 भाविकांना वाचवण्यात यश प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले कबरीचे अतिक्रमण काढल्याने निलेश लंकेंनाखटाकलं असेल गोपीचंद पडळकर
अ.नगरराजकीय

पंढरपुरातील चंद्रभागेत नदीत बुडणाऱ्या 6 भाविकांना वाचवण्यात यश

पंढरपुरातील चंद्रभागेत अनेक भाविक स्नानासाठी येतात. अशाच स्नानासाठी आलेले ६ जण चंद्रभागेत बुडत होते. नदीत बुडणाऱ्या ६ जणांना वाचवण्यात आलं आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भाविक चंद्रभागा नदीत बुडत असताना त्यांचा जीव थोडक्यात वाचवण्यात आला आहे. प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी या ६ भाविकांना बुडत असताना नदीतून योग्यवेळी बाहेर काढून वाचवलं आहे. चंद्रभागेत स्नानाला जाणाऱ्या भाविकांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते चंद्रभागेत बुडू लागले होते.

त्याचवेळी कोळी बांधवांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला.उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याचा विसर्ग केल्याने चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पंढपुरात चंद्रभागा नदीत उतरताना भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पंढपुरात अनेक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहे. विठ्ठलाच्या दर्शनाआधी अनेकजण चंद्रभागेत स्नान करतात. अशावेळी नदीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने आतापर्यंत काही भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन दिवसांपूर्वी २१ जून रोजी एका तरुण भाविकाचा चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button