
नाशिक / अहिल्यानगर | दि. १७ फेब्रुवारी २०२६
भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) संगमनेर तालुक्यात १३,००० रुपयांच्या लाचेप्रकरणी तलाठीसह दोन खाजगी इसमांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य (अहिल्यानगर घटक) यांनी सापळा रचून केली.
💰 जातीचा दाखला आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी पैशांची मागणी
तक्रारदार हा शिक्षण घेत असलेला युवक असून, त्याला व त्याच्या बहिणीला कुणबी जातीचा दाखला व कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र काढायचे होते.
आरोपी तलाठी बाबासाहेब गंगाधर बोहाडे (वय ५७, तलाठी आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) यांनी तहसील व प्रांत कार्यालयात ओळख असल्याचे सांगत यापूर्वी १३,००० रुपये लाच स्वीकारल्याचा आरोप आहे.
यानंतर तक्रारदाराच्या बहिणीचा दाखला काढण्यासाठी पुन्हा:
६,००० रुपये – जातीचा दाखला
७,००० रुपये – कास्ट व्हॅलिडिटी
अशी एकूण १३,००० रुपयांची मागणी करण्यात आली.
🎯 सापळा यशस्वी; ६ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात
दि. १७/०२/२०२६ रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला.
तलाठी बोहाडे यांच्या सांगण्यावरून:
हितेश सोमनाथ घोडेकर (वय २८, मेडिकल स्टोअर व्यवसाय)
प्रतीक विजयकुमार कातोरे (वय २६, मेडिकल स्टोअर व्यवसाय)
या दोघांनी तक्रारदाराकडून ६,००० रुपये स्वीकारून पुढे हस्तांतरित केले.
तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७अ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात येत आहे.
👮 वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सापळा अधिकारी :
पोलीस उप अधीक्षक श्री. अजित त्रिपुटे (ला.प्र.वि., अहिल्यानगर)
पर्यवेक्षण व मार्गदर्शन :
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र
अपर पोलीस अधीक्षक मा. भारत तांगडे
अपर पोलीस अधीक्षक मा. माधव रेड्डी
अपर पोलीस अधीक्षक मा. सुनील दोरगे
तपास अधिकारी : पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे
📢 नागरिकांना आवाहन – लाच मागितल्यास तक्रार करा
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तत्काळ तक्रार करावी.
📞 टोल फ्री क्रमांक : १०६४
📱 व्हॉट्सअॅप : ९९३०९९७७०० / ९१६८६४१०६४
🌐 संकेतस्थळ : acb.maharashtra.gov.in
भ्रष्टाचाराविरोधातील ही कारवाई प्रशासनासाठी इशारा मानली जात असून, “लाच मागणाऱ्यांना आता कुठेही पळता येणार नाही” असा स्पष्ट संदेश या सापळा कारवाईतून देण्यात आला आहे.
