Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
क्राईमशिर्डी

२० दिवसांपासून युवक बेपत्ता-अपहरण प्रकरणात ८ आरोपी निष्पन्न धमकीचा कॉल-शेवटचा फोन आणि बंद झालेली लाईन… तपासाचा थरारक प्रवास

राहाता (वा.) | प्रतिनिधी – दैनिक साईदर्शन
राहाता (वा.) शिर्डी येथील हॉलीडे पार्क परिसरातील रहिवासी सचिन कल्याणराव गिधे (वय अंदाजे ३०) हे गेल्या १८ ते २० दिवसांपासून बेपत्ता असून, त्यांच्या संशयास्पद अपहरणाच्या घटनेने संपूर्ण शिर्डी-राहाता परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने केवळ कुटुंबीयच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण केले आहे.
१० डिसेंबर : कामावरून निघालेला सचिन पुन्हा परतलाच नाही
१० डिसेंबर रोजी दुपारी कामावरून बाहेर पडलेले सचिन गिधे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांचा संशय बळावला. रात्री सुमारे ८ वाजता प्रवीण ऊर्फ पचास नानासाहेब वाघमारे याचा धमकीवजा फोन सचिनच्या घरी आला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याच रात्री १०.३० वाजता स्वतः सचिन गिधे यांनी पत्नी श्रद्धा यांना फोन करून,
“प्रवीण वाघमारे व दीपक पोकळे मला साकुरी-शिव परिसरातून घेऊन जात आहेत. मला काही बरे-वाईट झाल्यास हेच जबाबदार असतील”
असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
हा फोन म्हणजे सचिनचा शेवटचा आवाज ठरला. त्यानंतर फोन कायमचा बंद झाला.
हाच कॉल ठरला तपासाचा केंद्रबिंदू
या एका कॉलनेच पोलिस तपासाला कलाटणी दिली. सचिनच्या पत्नी श्रद्धा गिधे यांनी ११ डिसेंबर रोजी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी राहाता पोलिस ठाण्यात अपहरणाची सविस्तर फिर्याद दाखल करण्यात आली.
प्रारंभी ही फिर्याद प्रवीण ऊर्फ पचास वाघमारे व दीपक अंबादास पोकळे या दोघांविरोधात होती. मात्र तपास जसजसा पुढे गेला, तसतसे गुन्ह्याचे अनेक धागेदोरे उलगडत गेले आणि तब्बल आठ आरोपींची साखळी समोर आली.
एलसीबी, डीवायएसपी, उपविभागीय पथकांची संयुक्त कारवाई
या गंभीर प्रकरणात
एल.सी.बी. (स्थानिक गुन्हे शाखा)
श्रीरामपूरचे डी.वाय.एस.पी. यांचे पथक
शिर्डी उपविभागीय अधिकारी
राहाता पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक
यांनी उल्लेखनीय तत्परता दाखवत तपासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
एकाला अमानुष मारहाण : दुसऱ्या गुन्ह्याशी थेट संबंध
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून, सचिन गिधे यांच्यासोबत अपहरण झालेल्या आणखी एका युवकाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा स्वतंत्र गुन्हा राहाता पोलिस ठाण्यात दाखल आहे.
👉 या दोन्ही गुन्ह्यांचा परस्परसंबंध असल्याचे स्पष्ट संकेत पोलिस तपासात आढळून आले आहेत.
👉 प्रकरणाच्या मुळाशी अवैध धंदे, आर्थिक व्यवहार किंवा गुन्हेगारी साखळी असण्याची शक्यता पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे.
चार आरोपी अटकेत, उर्वरित फरार
या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करून त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
सध्या कृष्णा संतोष वाघचौरे हा आरोपी पी.सी.आर.मध्ये राहाता पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
फरार आरोपी :
गणेश दरेकर
प्रवीण ऊर्फ पचास नानासाहेब वाघमारे
दीपक अंबादास पोकळे
👉 फरार आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून, लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
हे आहेत निष्पन्न झालेले इतर आरोपी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावे :
शोभा अंबादास पोकळे
राणी दीपक पोकळे
संगीता भाऊसाहेब गमे
वनिता विनूनाथ कोठवळे
कुटुंबीयांचा आक्रोश… पण पोलिसांवर विश्वास
पंधरवडा उलटूनही सचिन गिधे यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
तरीही तपासाला आलेली गती पाहता गिधे कुटुंबीयांचा पोलिसांवर विश्वास कायम आहे.
“सचिन सुखरूप परत यावा, सत्य बाहेर यावे आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी,”
अशी भावनिक मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
दैनिक साईदर्शनने प्रकरण उजेडात आणले
या संपूर्ण गंभीर प्रकरणाला दैनिक साईदर्शनने सर्वप्रथम ठोसपणे उजेडात आणले, आणि त्यानंतर तपासाला अधिक गती मिळाल्याचे बोलले जात आहे.
👉 लवकरच या प्रकरणाचा मोठा उलगडा होणार, असा विश्वास पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button