Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरक्राईम

पंधरा हजार रुपयाची लाच घेतांना राहता पोलीस स्टेशनचा पोलीस लाचलुचपतच्या  जाळ्यात

शिर्डी प्रतिनिधी/ काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक कोटी रुपयांची लाच  ग्रोवर  प्रकरणात ठकसेन  भूपेंद्र सावळे याच्याकडून घेतल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठी चर्चा सुरू असताना  त्या घटनेतून काही बोध घेण्याची गरज असताना   दुसरी घटना घडली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अधिक माहिती अशी की राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत १८  सप्टेंबर रोजी  तक्रारदार  यांचा खडीने  भरलेला डंपर राहाता पोलीस यांनी राहाता येथील कापसेंच्या गितगंगा हॉटेलजवळ  पकडण्यात आला होता २१ सप्टेंबर रोजी लोकसेवक  पोकॉ अनिल रामनाथ गवांदे, राहाता पोलीस स्टेशन यांनी तक्रारदार यांना फोन करून बोलवून घेवुन राहाता पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खडी, वाळु इ.ची वाहतुक करायची असेल तर दर महिन्याला वीस हजार-रुपये हप्ता दयावा लागेल असे म्हणून तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली.होती

  तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगरकडे दि. २४ सप्टेंबर रोजी लाच मागणीच्या विरोधात  तक्रार नोंदविली होती . प्राप्त तकारीच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची लाचेची मागणीची पडताळणी केली असता

पोकों अनिल रामनाथ गंवादे, नेमनुक  राहाता पो.स्टे, यांनी तकादार यांचेकडे राहाता पोलीस स्टेशन मध्ये खडी, मरूम तसेच वाळुची वाहतुक करण्यासाठी आणि डंपरवर कारवाई न करण्यासाठी दरमहा वीस हजार रुपयाची लाचेची मागणी करून त्यापैकी १५ हजार  रूपये स्विकारण्याची तयारी दर्शवली. २५ सप्टेंबर रोजी रोजी सापळा कारवाई दरम्यान पोलिस कर्मचारी अनिल गवांदे यांनी तकारदार यांचेकडुन १५ हजार  रूपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे

गवंदे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते सदरची कारवाई  अहिल्यानगर येथील .लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाचे  पोलीस निरीक्षक   राजु अल्हाट . पर्यविक्षण अधिकारीः- पोलीस उप अधिक्षक  अजित त्रिपुटे  सापळा पथक पोलीस नाईक चंद्रकांत भिमसेन काळे,  शेखर बाळासाहेब वाघ,  किशोर  कुळधर, चालक  दशरथ भिमराव लाख यांनी या कारवाईत भाग घेतला सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक, भारत तागडे  


, अपर पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी  .. सुनिल दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, सुनिल  दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे   संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button