
शिर्डी प्रतिनिधी जिह्यात अकार्यक्षम अधिकारी राकेश ओला यांच्या बदलीनंतर सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सांभाळला आहे त्यांनी येताच अनेक वर्षांपासून एकच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या तात्काळ बदल्या केल्या आहेत.
परंतु शिर्डी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात अजूनही काही कर्मचारी गेल्या दहा बारा वर्षांपासून येथेच काम करीत आहेत यांच्याही बदल्या झाल्या पाहिजेत याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली असता पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयाने आमच्या कडे माहिती उपलब्ध नाही असे कळविले होते हे खरे आहे कि ह्या कर्मचारींना पाठीशी घालण्यासाठी अशी माहिती दिली गेली हे मात्र समजू शकले नाही
त्यानंतर एस पी कार्यालयात सुद्धा शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यक्षेत्रात एकूण किती कर्मचारी आहेत आणि त्यांची नियुक्त्यांची तारखेची माहिती अधिकारात माहिती मागितली असता एस पी कार्यालयाने सुद्धा माहिती दिलेली नाही ह्यामागील गौडबंगाल काय आहे
हे अजूनही गुलदस्त्यात आहे पोलीस अधीक्षकाचे नूतन पदभार घेतलेल्या सोमनाथ घार्गे यांनी शिर्डीच्या पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात गेल्या दहा पंधरा वर्षांपासून येथेच कार्यरत असणाऱ्या पोलिसांची बदली करावी अशी नागरिकांची मागणी आहे.