Letest News
राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीच्या वेळेत बदल श्रावण सोमवारी सायंकाळी ६ वाजताच धुपारती चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ! दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख...
राजकीयशिर्डी

वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश

साईनगरी शिर्डीत आज भक्ती, विकास आणि राष्ट्रशक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विमान प्रवास टाळून थेट मुंबई ते साईनगर शिर्डी असा Vande Bharat Express मधून प्रवास करत सर्वसामान्यांना पर्यावरणपूरक आणि आधुनिक रेल्वे प्रवासाचा संदेश दिला.
🌸 शिर्डीत भव्य स्वागत; मे फ्लॉवरने झाले अभिनंदन
साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन होताच राज्याचे जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil तसेच माजी आमदार Snehalata Kolhe यांनी दुर्मीळ आणि आकर्षक “मे फ्लॉवर फुटबॉल लिली” पुष्प देत अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
⚡ “भक्ती आणि शक्तीचा संगम”; संरक्षण प्रकल्पामुळे विकासाला चालना
शिर्डीजवळील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत तब्बल २०० एकर जागेवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दारुगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “भक्ती आणि शक्ती हे भारतीय अध्यात्मात एकत्र आहेत. दुर्बल व्यक्ती कधीच शांतता प्रस्थापित करू शकत नाही. आपण शक्तिमान असलो तरच जगाला साईंचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देऊ शकतो.” संरक्षण क्षेत्रातील हा प्रकल्प प्रदेशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
🚶‍♂️ साधेपणाची झलक; इलेक्ट्रिक वाहन टाळून पायीच ताफ्याकडे

sai nirman
जाहिरात

रेल्वेतून उतरल्यावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ बाहेर उभ्या असलेल्या वाहन ताफ्याकडे मुख्यमंत्री फडणवीस हे पायी चालत गेले. त्यांच्यासाठी खास ठेवण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनाचा वापर त्यांनी जाणीवपूर्वक टाळला. कार्यक्रमांना वेळेत पोहोचण्याबरोबरच साधेपणा आणि कार्यसंस्कृतीची झलक त्यांच्या वागण्यातून दिसून आली.
🛤️ “वंदे भारतचा प्रवास लाभदायी”; मुख्यमंत्र्यांचा अनुभव
मुख्यमंत्री म्हणाले, “माननीय मोदीजींनी देशाला दिलेली ही एक अनुपम भेट आहे. जगातील विकसित राष्ट्रांमध्ये जशा आधुनिक ट्रेन असतात, तशाच प्रकारची ही वंदे भारत ट्रेन आहे. आज मी मुंबईहून साईनगर शिर्डीला याच ट्रेनने आलो. अतिशय उत्तम अनुभव होता. प्रवासादरम्यान फाईलचे काम देखील करता आले. त्यामुळे हा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला.”

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button