Letest News
साईदर्शनासाठी आले अन् चोरटय़ाने कारच फोडली-आयटी इंजिनिअरचा लाखोंचा ऐवज लंपास शिर्डीत कारफोडीची दहशत-स... शिर्डीत किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट-भररस्त्यात तरुणाच्या पोटात चाकू खुपसून जीव घेण्याचा प्रयत्न वारंवार तेच आरोपी-तरीही धंदा सुरूच? कल्याणनंतर शिर्डीची पाळी? अवैध देहव्यापाराच्या रॅकेटवर कठोर कारव... रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र निवड समितीवर डॉ. सुरेश हावरे यांची नियुक्ती शिर्डीत शस्त्रतस्करांना पोलिसांचा दणका-स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ-भंडारदरा ४३ टक्क्यांवर निळवंडेतही समाधानकारक पाणीसाठा शिर्डीत 'चिल्लर गँग'चा धुमाकूळ! भाविकांचे मोबाईल-रोकड- पिशव्या लंपास-मध्यरात्री साईनगरीत अल्पवयीन टो... मुसळधार पावसाचा रेड अलर्ट-नदीकाठच्या गावांनी तातडीने सतर्क राहावे! शिर्डीच्या ६ गुन्हेगारांसह ६८ सराईत आरोपी तडीपार श्रीरामपूर विभागाची गुन्हेगारीवर मोठी कारवाई अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन
अ.नगरक्राईम

अप्पर पोलीस अधीक्षक : “आरोपीचा शोध युद्धपातळीवर-माहिती देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीस”

अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला; आरोपीचा शोध सुरू, २ लाखांचे बक्षीस जाहीर
संगमनेर : तालुका पोलीस स्टेशन हद्दीत १७ मार्च रोजी अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेपासूनच पोलिसांकडून आरोपीच्या शोधासाठी युद्धपातळीवर तपास सुरू आहे.
या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, डीवायएसपी कार्यालय संगमनेर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या एलसीबी पथकासह एकूण १० विशेष पथके कार्यरत आहेत. यामध्ये सायबर सेल व फॉरेन्सिक टीमचाही समावेश असून, विविध तांत्रिक व वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्यात येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


घटनेतील संशयित आरोपी अद्यापही निष्पन्न झालेला नसून, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मदतीने आरोपीचे स्केच (रेखाचित्र) तयार करण्यात आले आहे. हे स्केच पोलिसांनी व्हायरल केले असून, नागरिकांकडून माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी आरोपीबाबत खात्रीशीर माहिती देणाऱ्यास २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या हल्ल्यातील पीडित मुलगी सध्या प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी येथे उपचार घेत असून, तिच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. प्लास्टिक सर्जन, फिजिशियन तसेच समुपदेशक (काउन्सलर) यांची मदत तिला दिली जात आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.


घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित शाळा परिसरात महिला पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच गावातही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button