Letest News
जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स... "साईनगरीत वाढत्या गुन्हेगारीवर डॉ. पिपाडांचा पोलिस महासंचालकांना भावनिक पत्र " श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु...
अ.नगरशिर्डी

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने खूप समाधान व येथील अप्रतिम व्यवस्थेने खूप प्रसन्न वाटले–प्रसिद्ध मा.क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने खूप समाधान वाटले. त्याचप्रमाणे येथील अप्रतिम व्यवस्था पाहून प्रसन्न झाले असे सांगत
भारतीय क्रिकेट संघाने खूप छान खेळून चांगली कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. व तशी आमची अपेक्षाही होती. कारण आपली क्रिकेट टीम खूप चांगली होती व रोहित शर्मा आणि विराट कोहली वेळेवर फार्मात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

स्पिनर व सर्वांनी चांगला खेळ केला व आरामात जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली. त्यामुळे खूप आनंदी असल्याचे मत भारताचा प्रसिद्ध माजी क्रिकेट खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी शिर्डीत व्यक्त केले.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

साईदर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.‍
यावेळी दिलीप वेंगसरकर म्हणाले की, शिर्डीला साई दर्शनाला सर्व परिवारासह येत असतो.

मात्र यावेळी काही कारणास्तव फॅमिली आली नाही. मात्र मी आणि माझा मित्र शिर्डीला दर्शनासाठी आलो. साई दर्शन झाले. खूप प्रसन्न वाटले. येथे साई संस्थांनने अप्रतिम अशी व्यवस्था केली आहे .ते पाहूनही समाधान वाटते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button