Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरशिर्डी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी, जि. अहिल्यानगर | दि. ५ ऑक्टोबर २०२५

sai nirman
जाहिरात

श्री साईबाबांच्या पावन नगरीत आज सकाळी देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आगमन झाले. शिर्डी आगमनानंतर त्यांनी थेट श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन साईबाबांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेतले आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

DN SPORTS

kamlakar

या वेळी त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
दर्शनानंतर अमित शाह यांनी गुरूस्थान येथेही साईबाबांना वंदन केले.

🙏 मान्यवर मंत्र्यांची उपस्थिती:
या विशेष प्रसंगी राज्यातील अनेक मंत्री शिर्डीत दाखल झाले होते. त्यात

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,

जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) गिरीश महाजन,

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे,

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे
यांचा समावेश होता.

🌺 सन्मान सोहळा:
श्री साईबाबा संस्थानच्यावतीने अमित शाह यांचा मान्यवर सत्कार करण्यात आला. या वेळी साईबाबांच्या भक्तीभावाने वातावरण भारावले होते.

👨‍💼 मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती:
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तसेच साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

🔒 कडेकोट बंदोबस्त:
केंद्रीय मंत्री आणि राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांच्या भेटीमुळे शिर्डीत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांनी शांततेने आणि उत्साहाने स्वागत केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button