Letest News
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा...
अ.नगरशिर्डी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन!

शिर्डी,( प्रतिनिधी)  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतले.
त्यांच्यासमवेत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


श्री साईबाबा संस्थानच्यावतीने श्री.शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.


तत्पूर्वी श्री.शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,  विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ ) राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,  पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

तसेच
 केंद्रीय रस्‍ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री, ना.नितिन गडकरी यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्‍थान तदर्थ समिती अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश अंजु एस. शेंडे (सोनटक्‍के) व संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आदी उपस्थित होते.त्यांचा सत्कार संस्थान तर्फे करण्यात आला.

शिर्डी येथे भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विधानसभेत मिळालेल्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले आणि आणि तुमच्यामुळे एवढा मोठा विजय मिळवू शकलो असे त्यांनी म्हटले. ३० वर्षांच्या इतिहासात १०० पेक्षा जास्त जागा भाजपाला मिळाल्या. तसेच भाजपसाठी श्रद्धा सबुरी महत्वाची ज्यांना श्रद्धा सबुरी समजली नाही त्यांची हालत बुरी झाली असे देखील फडणवीस यांनी म्हटले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नाशिकमध्ये भाषण करत होते. गडकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत. शिवशाही स्थापन करण्यासाठी आपल्याला जनतेने निवडून दिलंय. ज्या अपेक्षेने जनतेने यश दिलंय, त्यातुन अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील जनतेने दिली आहे. आता युद्ध संपलंय, विजय मिळालाय, निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे रूपांतरण महाराष्ट्राचे सुराज्य करण्यात करा असा कानमंत्र नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button