Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
अ.नगरक्राईम

आजारी आईला उपचारासाठी नेत्यांना दोघांचा मृत्यू दोन दुचाकींचा अपघात तिघे ठार

एका दुचाकीस्वारला पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही ठार झाल्याची दुर्दैवी घटना चाकूर तालुक्यातील घरणी जवळच्या पुलाजवळ सोमवारी (19 मे) दुपारी घडली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

चाकुर तालुक्यातील घरणी येथील विठ्ठल धोंडीबा शिंदे (३५) आणि त्याची आई यशोदाबाई धोंडीराम शिंदे (६५) आणि विठ्ठलाचा मेव्हणा लालासाहेब पवार (३८) रा.तळेगाव घाट ता.आंबाजोगाई हे तिघे दुचाकी क्रमांक एम एच २४ बी.क्यू.६८३७ वरून घरणीहून चाकूरकडे येत होते. यशोदाबाई यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एका दुचाकीवरून हे जात होते.

दरम्यान लातूरहून चाकूरकडे येणारी दुचाकी क्रमांक २६ बी.एन. ७०१२ ही पाठीमागून येऊन विठ्ठल शिंदे यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात लालासाहेब पवार, यशोदाबाई शिंदे, विठ्ठल शिंदे हे गंभीररित्या जखमी झाले.तर दुसऱ्या दुचाकी वरील ज्ञानेश्वर संजय पांचाळ रा.सांगवी हेही गंभीररित्या जखमी झाले आहेत.

जखमींना चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. दरम्यान लालासाहेब पवार हे ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. तर यशोदाबाई शिंदे, विठ्ठल शिंदे यांना उपचारासाठी लातूर येथे पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला आहे. तर ज्ञानेश्वर पांचाळ यांच्या डोक्याला हेल्मेट होते. तेही गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठ, पोहेकॉ योगेश मरपल्ले, आत्माराम केंद्रे, बसलिंग चिद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यास त्यांनी मदत केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी ती मोकळी करून दिली आहे.याप्रकरणी कोणीही तक्रार दिली नसल्याने पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button