Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरशिर्डी

टीव्हीएस या प्रसिद्ध कंपनीकडून साई संस्थांनला इलेक्ट्रिक रिक्षा देणगी स्वरूपात प्रदान!

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथील
श्री साईबाबा संस्थानला टीव्हीएस या प्रसिद्ध कंपनीकडून TVS MAX EV इलेक्‍ट्रीक रिक्षा देणगी नुकतीच देण्यात आली आहे.
शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानला विविध प्रकाराने साई भक्तांकडून, विविध कंपन्यांकडून, विविध प्रकारची देणगी वस्तू ,वाहने, देणगी म्हणून दिली जातात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्या सेवेत अधिक सुविधा पुरविण्‍याच्या उद्देशाने TVS कंपनीच्या वतीने नुकतीच TVS MAX EV ही ३ चाकी इलेक्‍ट्रीक रिक्षा देणगी स्‍वरुपात प्रदान करण्यात आली आहे. साई संस्थानच्‍या वतीने या रिक्षा वाहनाची विधीवत पूजा करून टि.व्‍ही.एस. मोटर्सचे CEO के. एन. राधाकृष्णन यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे या नवीन वाहनाची चावी सुपुर्द केली आहे.


यानंतर, साईसंस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री के. एन. राधाकृष्णन यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला TVS कंपनीचे सेल्स रिजनल मॅनेजर मनप्रित सिंग छाब्रा, सर्व्हिस रिजनल मॅनेजर सौरव घोराई, एरिआ मॅनेजर आशिष जैसवाल

तसेच संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, विश्वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे व वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे यापूर्वीही TVS कंपनीने श्री साईबाबा संस्थानला ११ दुचाकी आणि २ तीन चाकी वाहने देणगी स्वरूपात प्रदान केली आहे. या देणगी सहकार्याबद्दल TVS कंपनीचे साई संस्थान कडून यावेळी विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button