Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
राजकीयशिर्डी

शिर्डी विमानतळास मालमत्ता जप्तीचे वाॅरंटकराची बाकी न भरल्याने काकडी ग्रामपंचायतीची कारवाई

शिर्डी प्रतिनिधी/

sai nirman
जाहिरात

शिर्डी आतरराष्ट्रीय विमानतळाकडे कराच्या थकबाकी पोटी  पाठपुरावा करुन देखील गावाच्या पायाभूत विकासासाठी ज्या भुमिपुत्रानी शेत जमिनी  देखील दिलेल्या असताना त्यांना मदत करण्याची  गरज असताना करापोटी देखील  थकबाकी वसुली होत नसल्याने वसुली साठी  जंगम मालमत्ता जप्तीचे वाॅरंट  विमानतळ प्रशासनाला काकडी ग्रामपंचायतीने दिले आहे अशी माहिती सरपंच पुर्वा  गुंजाळ यांनी दिली  शिर्डी लगत पण कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायत हद्दीत हे विमानतळ उभारण्यात आले आहे आठ कोटी ३०लाख इतकी रक्कम थकबाकी आहे  वसुली होत नाही म्हणून  महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२९ अन्वये हि कारवाई करण्यात आली आहे
 संरपच पुर्वा गुंजाळ यांनी सांगितले की  आठ कोटी ३०लाख इतकी मोठी रक्कम अनेक कालावधी पासून प्रलंबित आहे  काकडी गावाच्या दैनंदिन कामकाजावर व विकासावर मोठा परिणाम होत आहे  त्यामुळे ग्रामस्थांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे  महाराष्ट्र  विमान विकास  प्राधिकरण मुंबई  यांना दिलेल्या पत्रात  मागणी पत्र स्मरण पत्र  हुकूम नोटीस करवसुली नोटीस लोक अदालत नोटीस  ग्रामपंचायत ठराव नोटीस   सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत   तरी देखील थकबाकीवसुली साठी  भरणा केलेला नाही  जप्त कारवाईत  आर सी सी पध्दतीचे घर टर्मिनल बिल्डिंग पहिला मजला आदीसह विमानतळ प्राधिकरणाने बांधलेल्या अनेक इमारती कार्यालय रणवे   सब स्टेशन  पेट्रोल पंप  मनोरा तळ  ८२३,५० एकर जागा अशा विविध प्रकारच्या इमारती पोटी हि थकबाकी आकारणी करण्यात आलेली आहे  अनेकदा आश्वासन देऊन देखील  विमानतळ प्राधिकरण या ग्रामपंचायतची कराची रक्कम  देत नसल्याने ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत साईभक्त व भाविकांच्या हितासाठी ज्या गावाने विमानतळासाठी योगदान दिले त्याच गावाला कशा पद्धतीने वेठीस धरले जाते याचे हे एक प्रकारे उदाहरण  म्हटले पाहिजे

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button