
शिर्डी प्रतिनिधी
देशातील दोन नंबरचे देवस्थान आणि राज्यातील नंबर एक गर्दीचे ठिकाण म्हणून शिर्डीकडे पाहिलं जातं त्यामुळे शिर्डीच्या साई मंदिराला वारंवार टार्गेट करून धमक्या येत असतात आहे मे महिन्यात देखील अशाच प्रकारे धमकीचे मेल आले होते
त्यानंतर श्री साईबाबा संस्थान सह सर्व यंत्रणा अलर्ट बघायला मिळत होत्या काल दि. २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ८:०४ वाजता, श्री साईबाबा संस्थानच्या अधिकृत ई-मेल आयडीवर (obt@sai.org.in) “4 Nitric Improvised EDs Planted in Shirdi Sai Mandir/Rooms to Activate at 1PM, Clear All Devotees/Staff!” अशा विषयाची एक धोकादायक धमकीची ई-मेल आलाय होता
हे ई-मेल एक भगवंत मन्न नावाच्या व्यक्तीच्या bhagwanthmann@yandex.com या मेल आयडीवरून आलेली आहे. या मेलमध्ये असं म्हटलं आहे की, शिर्डी साई मंदिरात व त्यातील खोल्यांमध्ये ४ नायट्रिक Improvised Explosive Devices (IEDs) ठेवण्यात आल्या होत्या त्या दुपारी १ वाजता सक्रिय झाल्या होत्या,
त्यामुळे सर्व भाविक व कर्मचारी यांना तत्काळ मंदिर परिसरातून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानंतर संस्थानाने शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती खबरदारीचे सर्व उपाय योजना करण्यात आलेल्या होत्या कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे
साईभक्तास व ग्रामस्थांना काहीही अनुचित प्रकार घडत आहे असे दिसल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला कळवावे असेही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.