
कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण म्हणजेच बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा ! त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो अशी भावना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी व्यक्त केली.

डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप यांची बैलजोड आणुन त्यांची पुजा करुन त्यांना नैवद्य देण्यात आला. यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा,मदनलाल पिपाडा,नेमिचंद लोढा,महावीर पिपाडा,लिलाबाई पिपाडा,माया पिपाडा,सागर आनप साहील पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना सौ.पिपाडा म्हणाल्या की, बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त कऱणारा बैलपोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैल हाच ख-या शेतक-याचा मित्र असतो. “आवतन घ्या उद्या जेवायला या!” असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं. दुसऱ्या दिवशी बैलपोळा सण घरातील बैल अथवा पाळीव प्राण्यांविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणारा एक महत्त्वाचा सण आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे पशूपालन करणे. बैलामुळे शेतकऱ्याला शेत नांगरणे सोपे जाते. सहाजिकच बैल हा प्राणी शेतकऱ्याचा जीवाभावाचा सोबती असतो. त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. आज आधुनिक जगात ट्रॅक्टर द्वारे शेत नांगरले जाते.
मात्र असं असूनही पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा बैलपोळा मात्र शेतकरी बांधव आवर्जून साजरा करतात. ज्यांच्याकडे बैल नसतात अथवा कामानिमित्त शहरी भागात राहावे लागते असे लोक मातीचा अथवा लाकडाच्या बैलांची प्रतीकात्मक पूजा करतात. या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही.
बैलांना सजवले जाते आणि त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. बैलपोळ्याच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. बैल पोळ्यासाठी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे.
यासाठीच ” आज आवतन घ्या आणि उद्या जेवायला या ” अशा शब्दात बैलांना घरोघरी आमंत्रण दिलं जातं. काही ठिकाणी करमणूक म्हणून बैलांची मिरवणूक काढली जाते. यासाठी घरातील बैलाला सुंदर शाल आणि रंगरंगोटी करून सजवले जाते. हिंदू संस्कृतीत वृक्ष, प्राणी यांची पूजा करण्याची पद्धत आहे.
गेल्या 65 वर्षापासुन बैलपोळा साजरा करतो या दिवशी उपवास धरुन बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. बैलपोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालायची. घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके द्यायचे, शिंगाना बेगड, डोक्याला बाशिंग, गळयात कवडया आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमधे चांदीचे किंवा करदोडयाचे तोडे घालतात. नवी वेसण नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झुल पांघरुन त्यांची सजावट करायचो. 30-40 लोक एकत्र येवुन पुरणाच्यापोळीने उपवास सोडायचो असे मनोगत मदनलाल पिपाडा यांनी व्यक्त केले.