
शिर्डी( प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील निघोज येथील भर वस्तीच्या ठिकाणी शुक्रवार 3 जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चालू विद्युत पुरवठा बंद करून ट्रांसफार्मरचे 40 नटबोल्ट खोलून सुमारे दीडशे ते दोनशे ऑइल चोरून नेले. त्यामुळे सुमारे वीज वितरण कंपनीचे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे निमगाव निघोज व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यामुळे या परिसरात विद्युत पुरवठा बंद आहे.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील निघोज येथील साई चिंतन सोसायटी लगतच परिसराला विद्युत पुरवठा करणारी डीपी ( ट्रांसफार्मर) डी टी सी सिल्वर ओक विद्युत जनंत्र आहे. येथे सोसायटीतील अनेक घरे, आसपास बंगले आहेत. असे असतानाही शुक्रवार 3 जानेवारी 2025 च्या रात्री अज्ञात ईसमांनी या डीपीवरील विद्युत पुरवठा कट करून या डीपी ट्रांसफार्मरचे सुमारे 40 नटबोल्ट खोलून त्यातील सुमारे दीडशे ते दोनशे लिटर ऑइल चोरून नेले असल्याचे समजते .
दरम्यान डीपीतील ऑइल हे गरम असते. ते थंड होईपर्यंत भामटे तेथे होते .त्यांना या डीपीतील ॲल्युमिनियम चोरण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे समजते. मात्र हे करत असताना अचानक कोणीतरी आल्याचा आवाज या भामट्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जेवढे मिळेल तेवढे 150 ते 200 लिटर ऑइल घेऊन पोबारा केला. या डीपीमध्ये सुमारे 500 लिटर ऑइल असते. विद्युत पुरवठा चालू असताना तो कट करून या डीपी यातील अल्युमिनियम काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो अयशस्वी झाला.
. यासंदर्भात निमगाव येथील सब स्टेशनच्या अभियंत्याला नागरिकांनी रात्री विद्युत पुरवठा बंद झाल्या झाल्या फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही आणि येथील वायरमन यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की सकाळी बघू! आमच्याकडे रात्री वायरमेन नसतात. जर रात्री वायरमेन उपलब्ध असता तर कदाचित हे भामटे जागेवरच धरले गेले असते. विद्युत पुरवठा बंद झाला की सर्वत्र ओरड होते . या परिसरात अनेक बंगले घरे लॉज हॉटेल आहेत. लाईट गेल्यानंतर लगेचच सर्वत्र चर्चा होते. रात्री वायरमेन असता तर लगेच लक्षात आले असते. मात्र वायरमेन नसल्यामुळे विद्युत पुरवठा कशामुळे बंद झाला हे वीज ग्राहकांच्या लक्षात आले नाही तोपर्यंत भामट्यांनी ऑइल चोरून नेले.
या संदर्भात राहत्याचे वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला असून याचा तपास लागावा म्हणून पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच संगमनेर येथील वीजकार्यालयातून ही डीपी सुरू करण्यासाठी डी पी आणण्यात आली असून लवकरच या डीपीतून विद्युत पुरवठा साई चिंतन सोसायटी व परिसराला सुरू होईल असेही राहत्याचे मुख्य अभियंता पाटील साहेब यांनी सांगितले आहे.
रात्री हा सर्व प्रकार झाल्यानंतर शनिवारी 4 जानेवारी रोजी निमगाव सब स्टेशनचे कनिष्ठ अभियंता रोशन संजय बागुल यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, कि, राहता तालुक्यातील निमगाव येथील DTC सिल्वर ओक या डीपीचे शुक्रवारी मध्यरात्री मोठे नुकसान झाले आहे या डीपीचे नट बोल्ट कोपर पट्ट्या ऑइल तेथे अस्ताविस्तर पडलेले दिसले आहे त्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला असून सुमारे ऑइल नट बोल्ट ट्रांसफार्मर चे झाकण खाली पडल्याने सुमारे 25 हजार रुपये नुकसान झाल्याचे फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये एनसीआर 10 2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 अनन्वे कलम 324 (चार )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान विद्युत पुरवठा कट करून डीपीतून आईल चोरी करणारे व सुमारे पंचवीस हजार रुपयांचे डीपीचे नटबोल्ट झाकण कोपर पट्ट्या याचे नुकसान करणारे हे या विद्युत क्षेत्रातील जाणते असले पाहिजे. भरवस्तीत ही डीपी असताना ती डीपीचा विद्युत पुरवठा कट करून नट खोलून त्यातील ऑइल चोरी करणे किंवा नुकसान करणे हे मोठे अवघड काम असतानाही ते लीलया करणारे भामटे हे नक्कीच या विद्युत क्षेत्रातील माहिती गार असावेत अशी चर्चाही आता वीज कर्मचारी व नागरिकांमधून होत आहे. अशा पद्धतीने चोऱ्या करणाऱ्या भामट्यांना त्वरित पकडून शासन व्हावे अशी मागणी वीज ग्राहकांकडूनही होऊ लागली आहे